हेलिकॉप्टरमधून खाली पाहताना विहीरीतलं बघतो, माझं बारीक लक्ष असतं - शरद पवार

इंग्रजी- मराठी असा वाद सध्या सुरु असतो, मात्र जगाची ज्ञानभाषा इंग्रजी आहे. यश मिळवण्यासाठी इंग्रजी उपयुक्त ठरते.
Sharad Pawar
Sharad PawarSaam TV

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

पुणे : मी हेलिकॉप्टरमधून (Helicopter) खाली पाहाताना एखादी विहीर दिसली तर पाणी आहे का बघतो. घर असेल तर दारात काय आहे बघतो एवढं माझ बारीक लक्ष असतं असं वक्तव्य राष्ट्रवाचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं ते लाखेवाडी शेतकरी मेळावा आणि माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले (Srimant Dhole) यांचा राष्ट्रवादी पक्षप्रवेशाचा कार्यक्रमात बोलत होते.

ते म्हणाले, माझं शिक्षण संस्थांवर बारीक लक्ष असतं. मी अनेक शैक्षणिक संस्थांचा अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. माझं नेहमी लक्ष असतं महाराष्ट्रात कुठे चांगलं काम सुरु आहे. त्यात लाखेवाडीच्या शिक्षण संस्थेची मला माहिती मिळाली होत. आज त्या शैक्षणिक संकुलाच उद्घाटन झाल्याचं जाहीर करतो. इंग्रजी- मराठी असा वाद सध्या सुरु असतो. जगाची ज्ञानभाषा इंग्रजी आहे. यश मिळवण्यासाठी इंग्रजी उपयुक्त ठरते.

सकाळी मला निरावागमधील एका मुलीचा शिकागोतून फोन आला. ती म्हणाली मी पदवीधर आहे. नवरा एमटेक झालाय. आमचं शिकागोच्या घरं आहे. तुम्ही पाहायला या मी हवंतर विमान पाठवते. हा बदल शिक्षणामुळे झालाय. कृषीमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर अमेरिकेतून गहू आयात करण्यासाठीची फाईल आली. मला वाईट वाटलं. मी काम केलं मी पदमुक्त होताना तांदूळ, फळ निर्माण करणारा भारत १ नंबरचा देश होता गहू निर्माण करणारा दोन नंबरचा देश होता.

हे देखील पहा -

मी हेलिकॉप्टरमधून खाली पाहाताना विहीर दिसली तर पाणी आहे का बघतो. घर असेल तर दारात काय आहे बघतो. आज पेट्रोल डिझेल त्या किंमती वाढत आहेत. याला इथेनॉलचा पर्याय आहे. इथेनॉल पेट्रोल मधे मिक्स केलं तर गाडी त्यावर चालू शकते. दत्तामामा फार चिकट माणूस आहे. कामासाठी जिद्दी आहे. इंदापूर वर भरणेंच (Dattatraya Bharane) जास्त लक्ष असतं मी त्यांना सांगत असतो तुम्ही सात खात्यांचे मंत्री आहात. तिकडेही लक्ष द्या. आज देशात जात, धर्माच्या नावाने दुफळी निर्माण करण्याचं काम केलं जातंय. त्यापेक्षा विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी केंद्र सरकारला दिला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे देखील उपस्थित होते. श्रीमंत ढोले आणि प्रवेश करणारे इतर पदाधिकारी हे भाजप (BJP) नेते हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक होते.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com