मी विधानसभेत फडणवीसांना गुपचुप चिठ्ठी पाठवतो, कारण...- नितीन राऊत

देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद तसेच ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) एकाच मंचावर उपस्थीत होते.
मी विधानसभेत फडणवीसांना गुपचुप चिठ्ठी पाठवतो, कारण...- नितीन राऊत
Nitin RautSaam Tv

नागपूर: नागपूरमधील एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद तसेच ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) एकाच मंचावर उपस्थीत होते. कोरोना काळात योगदान देणाऱ्या लोकांचा सन्मान या कार्यक्रमात करण्याता आला. या कार्यक्रमात बोलताना नितीन राऊत यांनी नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. कोरोना काळात नागपुरातील सर्वच राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन काम केले. मी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आभार मानतो.

देवेंद्र फडणवीस यांची आजही मी मदत घेतो. विधानसभेत आजही माझ्या पक्षाला काही गोष्टी आवडत नसतील तर मी देवेंद्र फडणवीस यांची मदत घेतो असे नितीन राऊत म्हणाले. पुढे बोलताना राऊत म्हणाले की अर्थ खात्याच्या काही अडचणी असतील किंवा चिमटे काढायचे असतील तर देवेंद्र फडणवीस यांना गुपचुप चिठ्ठी पाठवून सांगतो. आम्ही समृद्धी एक्सप्रेसला ट्रेकच्या बाहेर जाऊन मदत केली, विरोध केला नाही. विकासाच्या कामात राजकारण आणलं नाही पाहिजे असेही राऊत म्हणाले.

Nitin Raut
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माच मनसुख हिरेन हत्येतील मुख्य आरोपी- NIA

दरम्यान या कार्यक्रमा बोलताना फडणवीस म्हणाले की अलीकडच्या काळात मी 1992 मध्ये किती वर्षाचा होतो याची चर्चा सुरू आहे. मी त्यावेळी 13 वर्षांचा होतो असंही म्हणतात, मात्र मी त्यावेळी नगरसेवक होतो. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या बुस्टर सभेत मी स्वत: बाबरी पाडण्यासाठी होतो याचा दावा केला होता. त्याला असे उत्तर फडणवीस यांनी दिले आहे.

काँग्रेस नेते गुलाम नबी आजाद यांनीही या कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले. त्यांनी फडणवीस यांच्याकडे पाहत काही टोमणेही मारले आहेत. मी स्वास्थ्य मंत्री म्हणून खूप बदलाव आणला. पण फडणवीसांच्या सरकार पब्लिसिटीमध्ये हिरो आहे, आम्ही मात्र झिरो होतो. मी टिका करत नाहीये. पण मी, आमचे सरकार, आमची पार्टी आम्ही केलेल्या कामाची पब्लिसिटी करू शकलो नाही असे मत आजाद यांनी व्यक्त केले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.