"पवार साहेब चुकीच्या माणसाला पाठीशी घालणारा सुद्धा चुकीचाच असतो"

मी जयंत पाटील आणि शरद पवार साहेबांना दोष देणार नाही.
"पवार साहेब चुकीच्या माणसाला पाठीशी घालणारा सुद्धा चुकीचाच असतो"
"पवार साहेब चुकीच्या माणसाला पाठीशी घालणारा सुद्धा चुकीचाच असतो"SaamTV

बीड : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी बीडमध्ये आंदोलन करत करणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी जाहीर भाषणातून धनंजय मुंडेसह Dhananjay Munde राष्ट्रवादीवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कारभारावर बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना NCP Leaders सल्लाही दिला आहे. (I will not blame Jayant Patil and Sharad Pawar - pankja munde)

हे देखील पहा -

त्या म्हणाल्या, 'जिल्ह्याचा पालक म्हणून जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याचा विकास योग्य पद्धतीने झाला पाहिजे, असा विचार असला पाहिजे. राष्ट्रवादीत तर कुणाचा कुणाला मेळ नाही. बीड मध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष NCP state president आल्यानंतर इथले एक आमदार दुसऱ्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकतात. ते एकमेकांच्या रेषा ओलांडत नाहीत, मग इथा कशी एकरूपता येईल, आणि त्या परिवार संवाद यात्रेचा उपयोग काय? मी दोष वरच्यांना देणार नाही, मी दोष जयंत पाटील Jayant Patil आणि शरद पवार Sharad Pawar साहेबांना देणार नाही. मात्र माझी विनंती आहे की त्यांनी एकदा येऊन बीडला येवून बघा, तुमच्या पक्षाची काय प्रतिमा आहे ते असं वक्तव्यं पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

"पवार साहेब चुकीच्या माणसाला पाठीशी घालणारा सुद्धा चुकीचाच असतो"
पालकमंत्र्यांमुळेच बीडचा विकास रखडला; पंकजा मुंडेंची, धनंजय मुंडेंवर टीका

लोकांच्या मनामध्ये काय दहशत आहे. लोकांच्या मनामध्ये कशाप्रकारे यांच्या विषयी भावना आहे", ही बघण्याची गरज आहे. त्यामुळे "चुकीच्या माणसाला पाठीशी घालणारं सुद्धा चुकीचा असतो" चांगल्या माणसाच्या पाठीशी नाही उभा राहिलं तर तुमचा काही उपयोग नाही. म्हणून आता आम्ही ठरवलं तुम्हाला आम्ही संधी दिली वर्ष-दीड वर्ष काम करण्याची. मात्र आता नाही. असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडत शरद पवारांना देखील बीडच्या राष्ट्रवादीचा चेहरा पाहण्याचा सल्ला दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.