... तर या गोष्टीला मी स्वतः विरोध करणार- शिवेंद्रराजे यांचा इशारा
... तर या गोष्टीला मी स्वतः विरोध करणार- शिवेंद्रराजे यांचा इशाराSaam Tv

... तर या गोष्टीला मी स्वतः विरोध करणार- शिवेंद्रराजे यांचा इशारा

जिल्ह्यामधील जावळी तालुक्यातील केडंबे हे गाव म्हणजे दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणाची पर्वा नकरता, कसाबच्या मुसक्या आवळत असताना ज्यांना वीर मरण आले.

सातारा : जिल्ह्यामधील जावळी Jawali तालुक्यातील केडंबे Kedamba हे गाव म्हणजे दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणाची पर्वा नकरता, कसाबच्या Kasab मुसक्या आवळत असताना ज्यांना वीर मरण आले, अशा तुकाराम ओंबळे यांचे गाव. I will oppose this myself

हे देखील पहा-

या गावामध्ये शहिद तुकाराम ओंबळे यांचे स्मारक व्हावे, यासाठी या अगोदर अजित पवार Ajit Pawar यांनी 10 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. त्यामध्ये स्मारकाच्या Monument बरोबरच गावाच्या विकासासाठी सुद्धा समावेश आहे. असे असताना आता हसन मुश्रीफ यांनी काही दिवसांपूर्वी या स्मारकासाठी 5 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केल्याने सातारा-जावळी चे आमदार शिवेंद्रसिंहराजे संतापले आहेत.

... तर या गोष्टीला मी स्वतः विरोध करणार- शिवेंद्रराजे यांचा इशारा
'मी कोणासोबत मिसळ खालेली नाही, तर मी पोहे खाल्ले होते' : शिवेंद्रराजे भोसले 

स्मारकाचा निधी कमी केला, तर मी स्वतः या गोष्टीला विरोध करणार असल्याचा इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे. या आधीच प्रशासनाने गावामधील जागा हस्तांतरला विलंब केल्याने, या स्मारकाच्या उभारणीला वेळ लागत असून प्रशासनाने आता लवकरात लवकर या प्रक्रिया पूर्ण कराव्यात, आशा सूचना देखील आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी दिले आहे. I will oppose this myself

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com