...तर मी रोज सहा तास हनुमान चालीसा अन् नमाज पठण करेल- राजू शेट्टी

राज्यात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) आणि मशिदीवरील भोंग्यांवरुन राजकारण तापले आहे.
...तर मी रोज सहा तास हनुमान चालीसा अन् नमाज पठण करेल- राजू शेट्टी
Raju ShettiSaam TV

हिंगोली: राज्यात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) आणि मशिदीवरील भोंग्यांवरुन राजकारण तापले आहे. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) घेतलेल्या भूमिकेवरुन राज्यात विविध पक्षातील नेते टीका करत आहेत. आता स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांची प्रतिक्रिया आली आहे. भोंगे काढल्याने व हनुमान चालीसा वाचल्याने राज्यातील महत्त्वाचे प्रश्न सुटत असतील तर मी दररोज सहा तास हनुमान चालीसा व सहा तास नमाज पठण करण्यास तयार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले आहेत. त्यांनी नाव न घेता राज ठाकरेंवरती टीका केली आहे.

दरम्यान राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेला मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा ही भूमिका घेतल्यानंतर राज्यातील वातावरण तापले. मनसेतील अनेक पदाधिकारी नाराज झाले, काहींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ठाण्यातील उत्तरसभेत राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि सरकाला ३ तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिला. आज राज ठाकरेंचे औरंगाबादमध्ये सभा होत आहे. त्यामुळे त्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आज भाजपची ही सभा होणार आहे. त्यामुळे राज्यातील हे विरोधी पक्ष आगामी काळातील निवडणूका लक्षात घेता काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.