मी फक्त शिवेंद्रराजेंच्या हातूनच बुके घेणार- जलसंपदामंत्री जयंत पाटील

जलसंपदामंत्री जयंत पाटील हे सातारा येथील एका कार्यक्रमासाठी आले होते.
मी फक्त शिवेंद्रराजेंच्या हातूनच बुके घेणार- जलसंपदामंत्री जयंत पाटील
मी फक्त शिवेंद्रराजेंच्या हातूनच बुके घेणार- जलसंपदामंत्री जयंत पाटीलओंकार कदम

सातारा : जलसंपदामंत्री जयंत पाटील Jayant Patil हे सातारा Satara येथील एका कार्यक्रमासाठी आले होते, त्यानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला District Central Bank यावेळी त्यांनी भेट दिली आहे. विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar, बँकेचे विद्यमान चेअरमन भाजप BJP आमदार शिवेंद्रसिंहराजे Shivendrasinharaje यांच्या बरोबरच इतर संचालक सुद्धा उपस्थित होते.

बराच वेळ सर्वांबरोबर विविध मुद्यांवर त्यांनी यावेळी चर्चा केली आहे. यानंतर बँकेच्या संचालक मंडळाने जेव्हा सत्कार करण्यासाठी पुष्पगुच्छ आणला, त्या वेळेस जयंत पाटील यांनी मी फक्त शिवेंद्रराजे यांच्या कडूनच बुके घेणार, असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. सातारची जिल्हा बँक ही पक्ष विरहित बँक असल्याची ख्याती सर्वत्र आहे.

हे देखील पहा-

सातारा जिल्ह्यात शिवेंद्रसिंहराजे यांचे राजकीय वजन मोठ्या प्रमाणात आहे. विधान सभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे NCP अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांची साताऱ्याची पाऊसामधील सभा मोठ्या प्रमाणात गाजली होती. या सभेनंतर महाराष्ट्राच्या Maharashtra राजकारणाची समीकरणच बदलून गेली आहेत. परंतु, ती सभा ज्या सातारा शहरात झाली आहे. त्या सातारा- जावळी Jawali मतदार संघात मात्र, भाजपमध्ये असणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे यांचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे.

या वेळीच शिवेंद्रराजे यांच्या राजकिय वजन आणि मतदार संघावर असलेली पकड याचा अंदाज सर्वांना आला होता. अगदी सोसायटी पासून ते विधानसभेच्या ३ मतदार संघावर शिवेंद्रसिंहराजे यांचा मोठा प्रभाव आहे. तसेच जिल्ह्यात त्यांचा चाहता वर्ग सुद्धा मोठा आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुद्धा रामराजे शिवेंद्रराजे या दोन नेत्यांची मोठी पकड आहे.

मी फक्त शिवेंद्रराजेंच्या हातूनच बुके घेणार- जलसंपदामंत्री जयंत पाटील
''मी आतापर्यंत कधीच राजकारण केले नाही ! केले ते फक्त समाजकारण''

शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar आणि शिवेंद्रराजे यांचे जिव्हाळ्याचे संबंध संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. सध्या शिवेंद्रराजे हे भाजपचे आमदार आहेत. या आधी ते राष्ट्रवादी मध्ये होते, तेव्हापासून ते आत्तापर्यंत राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्यांबरोबर त्यांचे नाते हे जिव्हाळ्याचे राहिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा विरोधी आमदार असून, देखील शिवेंद्रराजे यांना महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी विकास कामांसाठी दिला आहे. यामुळे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या या दौऱ्यात पुन्हा एकदा शिवेंद्रराजे आणि राष्ट्रवादीच्या मैत्रीचा प्रत्यय पाहायला मिळाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com