साहेब असते तर एसटी कर्मचाऱ्यांवर ही वेळ आली नसती..!

आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर एसटी कर्मचाऱ्यांना ही आंदोलनाची वेळ आली नसती, असे म्हणत अकोल्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन स्थळी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन केले.
साहेब असते तर एसटी कर्मचाऱ्यांवर ही वेळ आली नसती..!
साहेब असते तर एसटी कर्मचाऱ्यांवर ही वेळ आली नसती..!जयेश गावंडे

अकोला : आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर एसटी कर्मचाऱ्यांना ही आंदोलनाची वेळ आली नसती, असे म्हणत अकोल्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन स्थळी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन केले. गेल्या 20 दिवसापासून आपल्या मागण्यासाठी एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. सर्वच आगार मधील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

हे देखील पहा :

त्यामुळे जिल्ह्यातील बससेवा ठप्प झाली आहे. अकोल्यातील आगार क्रमांक दोन वर कर्मचारी आमरण उपोषणाला बसले आहेत. या उपोषण स्थळी आज स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन केले. गेल्या वीस दिवसापासून आम्ही आंदोलन करत असून आम्हाला ही शिकवण साहेबांनी दिले आहे. त्यामुळे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अमर रहे' च्या घोषणा देण्यात आल्या.

साहेब असते तर एसटी कर्मचाऱ्यांवर ही वेळ आली नसती..!
पुणे सहकार विभाग महिला अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल !

दरम्यान, आपल्या भावना व्यक्त करत आपल्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे. आपल्या मागण्यासाठी दररोज वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे. ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. एसटी महामंडळ बरखास्त करून राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यात यावे, ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com