''OBC आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यास हल्लाबोल आंदोलन करणार''

ओबीसी समाजाच्या (OBC Community) आरक्षणाच्या प्रश्नांवर, बीडच्या माजलगावमध्ये सकल ओबीसी समाजाची आज बैठक पार पडली आहे.
''OBC आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यास हल्लाबोल आंदोलन करणार''
''OBC आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यास हल्लाबोल आंदोलन करणार''विनोद जिरे

बीड: ओबीसी समाजाच्या (OBC Community) आरक्षणाच्या प्रश्नांवर, बीडच्या माजलगावमध्ये सकल ओबीसी समाजाची आज बैठक पार पडली आहे. बैठकीनंतर ओबीसी समाजाने, आता पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसण्याची तयारी दर्शविली आहे. सरकारने ओबीसींची जनगणना करावी, स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण पूर्ववत करावं. अन्यथा ओबीसी समाजाच्या वतीने, मोठ्या स्वरूपात हल्लाबोल आंदोलन करू. असा इशारा देत ओबीसी समाजाचे नेते सुभाष राऊत यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे.

ते म्हणाले, की ओबीसी समाज हा मागासलेला आहे. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलेला नाही, मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाही. त्यामुळं ओबीसी समाज दिवसेंदिवस मागास होत आहे. ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, नोकरी , राजकारणात राखीव जागा असणे गरजेचे आहे. त्यामुळे ओबीसी समाज हा हळूहळू मुख्य प्रवाहात येईल.

ओबीसी बांधवांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळणारे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळं ओबीसींच्या हक्काचं आरक्षण मिळविण्यासाठी आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी या बैठकीचं आयोजन केलं होतं. त्यामुळं सरकारने ओबीसींच्या मागण्या पूर्ण केल्या नाही. तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरून हल्लाबोल आंदोलन करेल. असा इशारा वजा अल्टीमेंटम ओबीसी नेते सुभाष राऊत यांनी सरकारला दिला आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com