आदिवासींची कामे होणार नसतील तर राजीनामा देऊन टाकेल; काँग्रेस आमदार आक्रमक

महाविकास आघाडीच्या आमदारांमधील आणखी एका आमदाराची खदखद बाहेर
Hiraman khoskar | हिरामण खोसकर
Hiraman khoskar | हिरामण खोसकर SaamTvNews

नाशिक : सिन्नरमधील शताब्दी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांकडून आदिवासी विभाग भवनावर आज आंदोलन करण्यात आले. आदिवासी विकास भवनने नाशिक जिल्ह्यात निवडलेल्या नामांकित शाळांमध्ये (School) मोठा घोटाळा झाल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी केला आहे. सदर शाळांसाठी आदिवासी विकास विभागाकडून (Aadivasi Vikas Vibhag) कोट्यवधी रुपयांचे अनुदान देण्यात येते. कोट्यावधी रुपयांचे अनुदान आदिवासी विकास विभागाकडून या शाळांना देण्यात येते. मात्र, शाळेतील विद्यार्थ्यांना या अनुदानाच्या अनुषंगाने कोणतीही व्यवस्था योग्य पद्धतीने मिळत नसल्याची खंत व्यक्त करत आदिवासी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. पोषण आहार आणि गणवेशासह विद्यार्थ्यांना इतर चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून आदिवासी भवनसमोर ठिय्या मांडून हे आंदोलन करण्यात आले.

हे देखील पहा :

शताब्दी इंग्लिश मिडीयम स्कुल (Shatabdi English Medium School) हि शाळा एका माजी शिक्षणाधिकाऱ्यांची असल्याची माहिती समोर येत असून काही महिन्यांपूर्वी ACB ने या शाळेचे संस्थाचालक असणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यावर कारवाई केली होती. त्यांच्याशीच संबंधित असणाऱ्या शाळेत या आदिवासी विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. दरम्यान, शाळेच्या सुविधांबाबत अनेकदा आदिवासी विकास भवनकडे तक्रार करूनही तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याच आंदोलनस्थळी इगतपुरीचे (Igatpuri) काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी भेट देऊन आदिवासी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यानिमित्ताने महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) आमदारांमधील आणखी एका आमदाराची खदखद बाहेर आल्याचे दिसून आले.

Hiraman khoskar | हिरामण खोसकर
यवतमाळ जिल्ह्यात टाइफॉइड, निमोनिया आजाराचे थैमान; रूग्णांना मिळेना बेड!

आदिवासींची कामे होणार नसतील तर राजीनामा देऊन टाकण्याचा इशारा देत आदिवासी नेते तथा काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला. जर राज्यातील आदिवासी समाजाची कामे मार्गी लागत नसतील तर या आमदारकीचा उपयोग काय? असे म्हणत खोसकरांनी नाराजी व्यक्त केली. राज्यातील आदिवासी आश्रम शाळेच्या मुद्द्यावरून आज झालेल्या आदिवासी विकास भवनवरील आंदोलनाच्या भेटी दरम्यान खोसकर यांची आदिवासी विकास विभागावरील नाराजी उघड झाली आहे. या प्रश्नासंदर्भात महिनाभरात कारवाई झाली नाहीतर प्रधान सचिव आणि आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचेही आमदार हिरामण खोसकर म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com