जालन्यात अवैध गर्भपात आणि लैंगिक शक्तिवर्धक औषधांची विक्री !
जालन्यात अवैध गर्भपात आणि लैंगिक शक्तिवर्धक औषदाची विक्री ! लक्ष्मण सोळुंके

जालन्यात अवैध गर्भपात आणि लैंगिक शक्तिवर्धक औषधांची विक्री !

जालना शहरात लैंगिक शक्तीवर्धक व गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांची अवैधरित्या विक्री करणाऱ्या मेडिकल विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या टीमने धाड टाकत गोळ्यांचा साठा जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : शहरात लैंगिक शक्तीवर्धक आणि गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधाची अवैधरित्या विक्री करणाऱ्या करणाऱ्या मेडिकल जनरल स्टोअर वर अन्न व औषध प्रशासनाच्या टीमने धाड टाकून मोठ्या प्रमाणावर गोळ्यांचा साठा जप्त केला आहे. संबंधित मेडिकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Illegal abortion and sale of sexual tonics in Jalna!

हे देखील पहा -

जुना जालना शहरातील रुबी मेडिकल आणि जनरल स्टोअर मधून मोठ्या प्रमाणत लैंगिक शक्तीवर्धक आणि गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधाची विक्री केल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी अन्न व औषध प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या.

अन्न व औषध प्रशासनच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून या स्टोअरची तपासणी केली असता या लैंगिक शक्ती वर्धक आणि गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधाची अवैधरित्या खरेदी करून विक्री केली जात असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली.

जालन्यात अवैध गर्भपात आणि लैंगिक शक्तिवर्धक औषदाची विक्री !
फिर्यादीच निघाला चोर ! सांगलीच्या शेडगेवाडीतील चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश

त्यामुळे शहरात चाललेला हा गोरखधंदा समोर आला आहे. या औषधांचे कोणतेही बिल, गोळ्या औषधावर व एमटीपी किटच्या स्ट्रीपवर उत्पादकांचा बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक, एमआरपी आढळून आल्या नसल्याने रुबी मेडिकल चालक महंमद जावेद यांच्या विरुद्ध औषध निरीक्षक अंजली मिटकर यांच्या तक्रारी वरून रात्री उशिरा कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशासनाच्या या कारवाई मुळे शहरात गर्भपात आणि लैंगिक शक्तीवर्धक औषधांचा गोरखधंदा राजरोसपणे केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून त्यामुळे शहरात एकच खबळ माजली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com