अवैध गोवंशाची तस्करी करणाऱ्यांना अटक: आर्णी पोलीसांची कारवाई...

यावेळी पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये २३ गोवंश असल्याचे आढळून आले. त्यावरून पोलिसांनी २३ गोवंश आणि एकूण ३० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
अवैध गोवंशाची तस्करी करणाऱ्यांना अटक: आर्णी पोलीसांची कारवाई...
अवैध गोवंशाची तस्करी करणाऱ्यांना अटक: आर्णी पोलीसांची कारवाई...संजय राठोड

संजय राठोड, यवतमाळ

यवतमाळ: मध्य प्रदेशच्या छत्तेपूर ते नागपूर, वर्धा, यवतमाळ मार्गे हैदराबाद येथे गोवंशांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा १४ चाकी ट्रक नागपूर तुळजापूर महामार्गावरील आर्णी बायपासवर पकडण्यात आला, ही कारवाई आर्णी पोलिसांनी केली. (Illegal cattle smugglers arrested: Arni police action)

हे देखील पहा -

गोवंशाची कत्तल ही कायद्याने बंदी असतानाही छत्तेपूर ते नागपूर, वर्धा यवतमाळ नांदेड मार्गे हैदराबादकडे ट्रकमध्ये कत्तलीकरिता जनावरे घेऊन जात असल्याची माहिती यवतमाळ येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली, त्यांनी या ट्रकचा पाठलाग सुरू केला. ही बाब ट्रक चालकाच्या लक्षात येताच त्याने ट्रकचा वेग वाढवला व सुसाट वेगाने त्यांनी भांब येथील टोल नाक्याचे आडवे दंटे तोडून पळ काढला. त्यानंतर थेट आर्णी बायपासजवळ येऊन त्या ठिकाणी असलेल्या पोलिस वाहनाजवळ येऊन तो थांबला. या वेळी त्याने घडलेली संपूर्ण हकिकत पोलिसांना सांगून स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले.

अवैध गोवंशाची तस्करी करणाऱ्यांना अटक: आर्णी पोलीसांची कारवाई...
बीड जिल्ह्यात विविध अपघातात 2 जण जागीच ठार, तर 4 जण गंभीर जखमी...

यावेळी पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये २३ गोवंश असल्याचे आढळून आले. त्यावरून पोलिसांनी २३ गोवंशा आणि एकूण ३० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. सोबतच ट्रक चालक मुन्ना खान, प्यारेलाल खान, राजा ऊर्फ मुबारक सादिक कुरेशी, मोहम्मद जुबेद मोहम्मद मुश्ताक तिघेही रा. औरय्या, उत्तर प्रदेश यांना अटक केली. ही कारवाई आर्णी पोलिस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव यांच्या नेतृत्वात अमित झेंडेकर, मनोज चव्हाण, सतीश चौदर, दिनेश जाधव, मिथून जाधव, सचिन पिसे यांनी केली.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com