गावखेड्यात दारू विक्रेत्यांचा हैदोस; सारोळा गावात महिलांनी पकडली अवैध दारू

पोलिसांची निष्क्रियता अल्का लोखंडे यांचा आरोप
गावखेड्यात दारू विक्रेत्यांचा हैदोस; सारोळा गावात महिलांनी पकडली अवैध दारू
latur Newsदीपक क्षीरसागर

लातूर - मटका, गुटका आणि अवैध देशी दारूने गावखेड्यातील तरुण पिढीला याचे व्यसन लागत आहे. याकडे पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत डोळेझाक करत आहे. लातूर (Latur) जिल्ह्यातील औसा तालुक्यातील सारोळा गावातील महिलांनी अवैधपणे विक्री होत असलेली देशी दारू पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. विशेष बाब गावातील महिलांनी अनेकदा पोलीस (Police) ठाण्यात अवैध देशी दारू बंद करण्याची मागणी केली पण पोलीस केवळ डोळेझाक करत असून यामुळे गावातील 15 वर्षांची मूले चक्क देशी दारू पितात यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. (Illegal liquor seized by women in Sarola village)

हे देखील पहा -

दारू पिऊन माणसं महिलांना मारहाण करत असतात यामुळे घरातील एका दारुड्यामूळ बायका पोरं याचं जगणं कठीण झाले आहे. पोलिसांनी तात्काळ दारू विक्रेत्यांवर कारवाई करून गावातील दारू बंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अल्का लोखंडे यांनी केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.