स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू वाहतुकीवर डोळेझाक...

मुंबईहून आलेल्या पथकाद्वारे शहाद्यात 14 लाखांचा अवैध बियर साठा जप्त...
स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू वाहतुकीवर डोळेझाक...
स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू वाहतुकीवर डोळेझाक...दिनू गावित

नंदुरबार - जिल्ह्याला लागून मध्यप्रदेश आणि गुजरात राज्याच्या सीमा असल्याने सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात अवैध दारू वाहतुक सुरू असल्याचे मुंबई हुन आलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईने स्पष्ट झाले आहे. अवैधरीत्या दारू वाहतुक कारवाई वर स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभाग व जिल्हा पोलीस दलाची निष्क्रियता पुन्हा एकदा समोर आली आहे. सीमावर्ती भागातील अवैध धंद्यांना राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलीस दल जाणून बुजून डोळेझाक करत आहे की पाठबळ देत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हे देखील पहा -

मध्यप्रदेश राज्यात निर्मित बियर अवैधरित्या गुजरातला वाहतूक करताना शहादा तालुक्यातील मामाचे मोहिदे शिवारात मुंबईहून आलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 14 लाख 37 हजार 600 रुपये किमतीचा अवैध बियर साठ्यासह दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्याच बरोबर 8 हजार रुपयांचा मोबाईल संच, सात लाखाचे वाहन असा एकूण 21 लाख 45 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत कारवाई केली आहे. शासनाचा महसूल बुडवून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू वाहतूक सुरू असतानाही नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कारवाई का करत नाही? मुंबईहून आलेल्या पथकाला कारवाई करावी लागत आहे.

स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू वाहतुकीवर डोळेझाक...
शिवाजी महाराज हा सप्ताक्षरी मंत्र आयुष्यभर जोपासणारा शिवशाहीर हरपला - सुधीर मुनगंटीवार

हे नंदुरबार जिल्हा पोलीस दल व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्दैव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सदर वाहन महाराष्ट्राच्या हद्दीतून गुजरातकडे पास करण्यासाठी एक पोलिस कर्मचारी चार चाकी वाहनातून फिरत असल्याचेही आढळून आल्याने अवैध धंद्यांना पोलिसांचे पाठबळ असल्याचेही समोर आले आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी काय कारवाई करतात हेही बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सदर कारवाईत मध्यप्रदेश राज्यात निर्मिती करून विक्रीसाठी परवाना असलेला व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला अवैध बियर साठा वाहतूक करत असल्याने मुंबईहून आलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com