वाहनातून फटाक्यांची वाहतुक करणार आहात? वसमतला काय घडले वाचा

Cirme News
Cirme News

हिंगोली : दिवाळीच्या Diwali Festival 2021 पार्श्वभुमीवर विक्रीसाठी आणलेले फटाके Fire Crackers पाेलिसांनी जप्त केले असून एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई हट्टा पाेलिस ठाण्याच्या हद्दीत वसमत-परभणी राेडवर चिखली फाट्यानजीक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे ७ लाख ५६ हजार ७२० रुपयांचा एेवज पाेलिसांनी जप्त केला आहे. आज (गुरुवार) पाेलिसांनी रामचंद गु़गे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Cirme News
फेसबुक कमेंटवरून राडा; पोलिसांवरही हल्ला; १५० जणांवर गुन्हा

वसमत-परभणी मार्गावर चिखली पाटीनजीक बुधवारी (ता.२०) सायंकाळी एक पाेलिसांनी एक वाहन अडविले. या वाहनाची तपासणी करताना त्यांना त्यामध्ये फटाके आढळले. चाैकशीअंती हे फटाके विक्रीसाठी नेत असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली.

दरम्यान काेणतीही सुरक्षेची उपाययोजना न करता मनुष्याच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने फटाक्यांची वाहतुक केल्याने पोलिसांनी आज (गुरुवार) रामचंद गु़गे (राहणार एरंडेश्वर, तालुका पुर्णा, जिल्हा परभणी) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com