राष्ट्रीय महामार्गावर तुमच्यावरही पडते का अशी "टोलधाड"

राष्ट्रीय महामार्गावर तुमच्यावरही पडते का अशी "टोलधाड"
टोल नाका

अहमदनगर ः टोलधोरण ठरवित असताना स्थानिकांना टोल लागत नाही. कारण सातत्याने त्यांना तेथून ये-जा करावी लागते. त्यामुळे ठरविक अंतरापर्यंत त्यांना टोल आकारला जाऊ नये, असे ठरले आहे. तरीही बहुतांशी टोलनाक्यांवर स्थानिकाच्या वाहनांना टोल आकारला जातो. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.

संगमनेर तालुका हद्दीतून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावरील बेकायदा, मनमानी टोल वसुली बाबत स्थानिक व या मार्गावरील प्रवासी वर्गातून सातत्याने तक्रारी येत आहेत. या टोलचा सर्वाधिक फटका तालुक्यातील स्थानिक वाहन धारकांना बसतो आहे. Illegal toll collection on Nashik-Pune National Highway

टोल नाका
काँग्रेस नेता ः मी विनयभंग केलाय? थांबा, सीडी लावतो!

टोल प्रशासनाच्या मनमानीविरोधात अनेकदा आंदोलने होवूनही त्यांच्या वर्तणूकीत बदल होत नसल्याने, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. याबाबत पूर्वी आंदोलने करुन, उपविभागीय अधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीतील निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी झाली नसल्याकडे जिल्हाध्यक्ष कपील पवार यांनी प्रसिध्दी पत्रक काढले आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 नवीन 60 ( पुणे - नाशिक ) वरील टोलनाक्यावरील तक्रारीसंबंधी प्रांताधिकारी कार्यालयात, टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत 10 ऑगस्ट 2021 रोजी बैठक झाली होती. त्यावेळी टोल नाक्यावर येणाऱ्या जाणाऱ्या तालुक्यातील व शहरातील नागरिक, शेतकरी, व्यावसायिक व व्यापाऱ्यांकडून होणारी बेकायदा वसुली, रस्त्याची अपूर्ण कामे, खड्डे, बंद पडलेले पथदिवे या बाबत चर्चा झाली. Illegal toll collection on Nashik-Pune National Highway

स्थानिकांचे परस्पर कट होणारे पैसे बंद होतील तसेच स्थानिकांना टोल आकाराला जाणार नाही, सर्व प्रलंबित कामे 15 दिवसात करण्याचे टोल प्रशासनाने मान्य केले होते. मात्र, त्यावर अद्यापही कार्यवाही झाली नाही. या निवेदनावर तालुका अध्यक्ष आबासाहेब थोरात, जिल्हाध्यक्ष कपील पवार, शहराध्यक्ष प्रशांत वामन, महिला तालुकाध्यक्ष वैशाली राऊत, अक्षय भालेराव, राहुल वर्पे, अमोल राऊत, केवल आव्हाड आदींच्या सह्या आहेत.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com