डॉ.स्वप्नदीप थळे मारहाण प्रकरणी IMA ने घेतली दखल

अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर स्वप्नदीप थळे यांच्यावर कोव्हिड सेंटरमध्ये कोरोना उपचार घेणाऱ्या रुग्णाने 14 जुलै रोजी हल्ला केला होता.
डॉ.स्वप्नदीप थळे मारहाण प्रकरणी IMA ने घेतली दखल
डॉ.स्वप्नदीप थळे मारहाण प्रकरणी IMA ने घेतली दखल राजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड : अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर स्वप्नदीप थळे यांच्यावर कोव्हिड सेंटरमध्ये कोरोना उपचार घेणाऱ्या रुग्णाने 14 जुलै रोजी हल्ला केला होता. या हल्ल्यात डॉ.स्वप्नदीप हे जखमी होऊन त्यांचा डावा डोळा निकामी झाला होता. डॉ.स्वप्नदीप थळे यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी याच्याकडे निवेदनामार्फत केली आहे. अलिबाग पोलीस ठाण्यात डॉक्टरला मारहाण करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. IMA takes notice of Dr. Swapnadeep Thale assault case

कोरोना विषाणू संकट देशात सुरू झाल्यापासून शासकीय डॉक्टर गेल्या दोन वर्षापासून रुग्णांची अहोरात्र सेवा करीत आहेत. कोरोनापासून रुग्णांना वाचविण्यासाठी डॉक्टर जीवाचे रान करीत आहेत. मात्र असे असले तरी डॉक्टरांवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाणीचे प्रकार घडतच आहेत. त्यामुळे आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयूत कोव्हिड सेंटरमध्ये लोणारे येथील रहिवासी कोरोनावर उपचार घेत आहे. 14 जुलै रोजी या रुग्णाने कोणतेही कारण नसताना रात्रपाळीत आपली सेवा बजावणाऱ्या डॉ.स्वप्नदीप थळे याच्यावर सलाईन स्टँड द्वारे चेहऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात थळे याच्या मस्तकावर मारहाण झाल्याने डावा डोळा निकामी झाला. या घटनेनंतर मारहाण करणाऱ्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. डॉ.स्वप्नदीप थळे यांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडून देण्यात आले आहे.

डॉ.स्वप्नदीप थळे मारहाण प्रकरणी IMA ने घेतली दखल
महाडमध्ये पोलिसांचे मॉकड्रिल

डॉ.स्वप्नदीप थळे यांच्यावर झालेल्या मारहाणीची दखल इंडियन मेडिकल असोसिएशननेही घेतली. मारहाण करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करावी जेणेकरून पुन्हा डॉक्टरांवर हल्ले करण्याचे असे कृत्य करण्यास कोणीही धजावणार नाही. अशी मागणी निवेदनातून इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी निधी चौधरी याच्याकडे केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.रामकृष्णा लोंढे, राज्य सचिव पंकज भांडारकर, हल्ला समिती चेअरमन डॉ राजेंद्र कुलकर्णी यांच्या सहीने हे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com