
अमर घटारे
Maharashtra Weather Updates : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढउतार पाहायला मिळत आहे. राज्यात एकीकडे उन्हाचा उकाडा वाढला आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही भागात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्याच्या पश्चिम विदर्भात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या गारपिटीचा विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो.
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, राज्यातील पश्चिम विदर्भात गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिमी हिमालयाजवळ पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाले आहे. तो हळू हळू पूर्व दिशेला सरकत आहे. यासोबतच हवेच्या खालच्या थरात चक्रकार वारे आहेत. त्यामुळे अमरावती विभागात गारपीट होण्याची शक्यता आहे.
कोणकोणत्या भागात कोसळणार पाऊस?
कोकणासह मध्य महाराष्ट्रात तापमानात वाढ झाली आहे. मात्र, या भागात पुढील दोन दिवसात पुन्हा तापमानात घट होणार आहे. १४ ते 15 मार्च दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर 14 आणि 15 मार्च रोजी विदर्भातील तूरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
चक्क उन्हाळ्यात तुरळक पाऊस कोसळणार असण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते.
मुंबई शहरात उष्णतेची लाट
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा तापमानात वाढ झाली आहे. शनिवारी सांताक्रुझ केंद्रावर सर्वाधिक 38.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले. कोकणात सरासरीपेक्षा 6 अंश सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद झाली. १३ मार्चपासून पुढील दोन दिवस मुंबई शहर आणि उपनगरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.