नवरदेव बाशिंगासहीत घुसला थेट बिअर बारमध्ये; व्हिडीओ वायरल

लग्न लावून आलेला नवरदेव थेट बियर बारमध्ये (Beer bar) जाऊन पेग मारताना दिसून आला आहे.
Buldhana Viral Video News
Buldhana Viral Video News संजय जाधव

बुलडाणा : सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून प्रत्येत नवरा-नवरी आपलं लग्न इतरांपेक्षा वेगळे ठरावे म्हणून विविध फंडे वापरतात. त्याबाबतचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात हे आपण पाहत असतो. मात्र, आता बुलडाणा जिल्ह्यातील (Buldana District) एक नवरदेव कपाळावर बाशिंग बांधून थेट वाईन बार मध्ये पेग मारतांना दिसला आहे. त्यामुळे सध्याची तरुण पिढी ही व्यसनाच्या आहारी गेल्याचं दिसतं आहे.

ओठावर मिसरूड देखील आली नसलेले, आणि नुकतेच वयात आलेली मुलं देखील आता वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन करत असल्याचे देखील अनेक घटनेवरून दिसून येतं आहे. अशातच अलीकडच्या काळामध्ये लग्नसमारंभ असो की वाढदिवस अशा अनेक कार्यक्रमांमध्ये दारू पिण्याचा तर प्रकारे ट्रेंड झाला आहे. लग्न समारंभ म्हंटलं की नवरदेवाकडून त्याची मित्रमंडळी हक्काने दारूची व्यवस्था करून घेतात आणि नवरदेवही लग्नाच्या आनंदात त्यांची सगळी व्यवस्था करतात.

हे देखील पाहा -

मात्र, लग्न लावून आलेला नवरदेव थेट बियर बारमध्ये (Beer bar) जाऊन पेग मारताना दिसून आला आहे. खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी फाट्यावरील एका बियर बारमध्ये नवरदेव रात्री आठ वाजता कपाळावर बाशिंग बांधून आला आणि दारूचा पेग मारला, त्यामुळे त्याला पाहून सर्वजण अचंबित झाले होते. तर नवरदेवाने किमान लग्नाची हळद उतरेपर्यंत हे धीर धरायला हवा होता अशा चर्चा नागरिकांमध्ये रंगल्या आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com