Ganpati Bappa : चंद्रभागा नदी पात्रात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास बंदी!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पंढरपुरात साधेपणाने गणेश विसर्जन करण्यात आले. दरम्यान चंद्रभागा नदी पात्रात गणेश मूर्ती विसर्जन करण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे.
Ganpati Bappa : चंद्रभागा नदी पात्रात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास बंदी!
Ganpati Bappa : चंद्रभागा नदी पात्रात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास बंदी!SaamTvNews

पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पंढरपुरात साधेपणाने गणेश विसर्जन करण्यात आले. दरम्यान चंद्रभागा नदी पात्रात गणेश मूर्ती विसर्जन करण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे नगरपालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जन करण्यात आले आहे.

हे देखील पहा :

दरवर्षी चंद्रभागा नदीपात्रामध्ये पंढरपूर शहरातील नागरिक गणेशाचे मूर्तीचे विसर्जन करतात. यावर्षी जिल्हा प्रशासनाने चंद्रभागेत गणपती मूर्ती विसर्जन करण्यास बंदी केली आहे. पोलिसांनी नदीपात्रा लगतच्या सर्व घाटांवर बेरी कटिंग करून गणेश भक्तांना नदीपात्रात जाण्यास बंदी केली आहे.

Ganpati Bappa : चंद्रभागा नदी पात्रात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास बंदी!
बीड कि बिहार? भर चौकात भाजी विक्रेत्या महिलेला शरीरसुखाची मागणी!

नगरपालिकेने पंढरपूर शहरातील विविध भागात 13 ठिकाणी गणेश मूर्ती संकलन मंडप उभारले आहेत. या‌ठिकाणी गणेश मूर्ती संकलन केले जात आहे. शहरातील नागरिकांनी ही नगरपालिकेच्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला आहे. ढोल ताशांचा किंवा डॉल्बीच्या दणदणाटा शिवाय अतिशय शांततामय वातावरणामध्ये आज गणेश विसर्जन केले जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com