MNS: किंग मेकर नाही, किंग बनणार - बाळा नांदगावकर

आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मनसेची महत्वाची बैठक पार पडली.
MNS leader bala nandgaonkar
MNS leader bala nandgaonkar saam tv

मुंबई: आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मनसेची महत्वाची बैठक पार पडली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध समित्या तयार करण्यात आल्या असून समित्यांची घोषणा या बैठकीत झाली (Important meeting of MNS was held for forthcoming municipal elections).

या बैठकीत बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमेय खोपकर, शिरीष सावंत, संदीप देशपांडे या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. सोबतच मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तब्बल दीड तास मनसेची (MNS) ही बैठक सुरू होती.

MNS leader bala nandgaonkar
MNS with BJP in BMC elections? : बीएमसी निवडणुकीत मनसे भाजपसोबत?, राज ठाकरे स्वतंत्र लढणार का?

"येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज शिवतीर्थ येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्रातील पदाधिकारी यांची बैठक घेतली. बैठकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीत पक्षाच्या वतीने त्याच्या विभागात जाऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी करून त्यावर काम करावे यासाठी संध्याकाळी पदाधिकारी व का कार्यकर्ते यांच्या समिती जाहीर करून त्यांना प्रत्यक्ष निवडणुकीत काय काम करायचे याच्या सूचना दिलेले आहेत. या समित्यांमध्ये प्रत्येकी 3-4 सदस्य असणार आहेत. तसेच मनसे पक्षाचे नेते हे महाराष्ट्र दौरा करणार आहेत . दौरा केल्यानंतर राज ठाकरे यांना दौऱ्याचा अहवाल देतील, त्यानंतर राज ठाकरे दौऱ्यावर जाणार", असं बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी सांगितलं.

"मुंबईच्या बाबतीत पाहिजे तेव्हढी चर्चा झाली नाही. मुंबईसोडून पूणे, नाशिक यावर चर्चा झाली. प्रत्येकाने स्वतःचा अहवाल द्यावा, प्रत्येक समितीत 3-4 सदस्य असतील. आरोप प्रत्यारोप वर्षानुवर्षे होत आहेत. आम्ही सामान्यांच्या प्रश्नाकडे आम्ही लक्ष देणार आहेत", असं बाळा नांदगावकर म्हणाले.

MNS leader bala nandgaonkar
BJP-MNS Alliance : भाजप-मनसे युतीची अजुनही अपेक्षा, हात पुढे केल्यास मनसेची चर्चेची तयारी

आम्ही किंग मेकर नाही, किंग बनणार आहोत - बाळा नांदगावकर

महापालिका निवडणुकांसाठी मनसेने तयारीला सुरुवात केलीय, सातत्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतायत. त्यामुळे पालिका निवडणुकांमध्ये मनसे आपलं अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. याविषयी मनसे नेते बाळा नांदगावकर यांना विचारलं असता ते म्हणाले, "आम्ही किंग मेकर नाही, किंग बनणार आहोत. ज्यांना कोणाला सोबत घ्यायचं ते बघतील, आम्ही किंग बनण्याचा प्रयत्न करणार आहोत. कार्यकर्त्यांसोबत बैठका घेतोय. स्थानिक लेव्हलवर बैठका सुरु आहेत. राज ठाकरेंचा दौरा अद्याप ठरलेला नाही", अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com