Imtiaz Jaleel News: मुंबई हायकोर्टाच्या निर्देशावर खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Imtiaz Jaleel News: मुंबई हायकोर्टाच्या या निर्देशावर खासदार इम्तियाज जलील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Imtiyaz Jaleel
Imtiyaz Jaleelsaam tv

नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhaji nagar: मुंबई हायकोर्टाने नामांतराबाबत अंतिम अधिसूचना येत नाही, तोपर्यंत औरंगाबादचं नाव सरकारी दस्तावेजांवर बदलू नका, असे निर्देश दिले आहे. औरंगाबाद नामांतरावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीत मुंबई हायकोर्टाने निर्देशाचे छत्रपती संभाजी नगर नावाला विरोध करणाऱ्यांना राजकीय नेत्यांनी स्वागत केले आहे. मुंबई हायकोर्टाच्या या निर्देशावर खासदार इम्तियाज जलील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

खासदार इम्तियाज जलील म्हणाले, 'मुंबई उच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत. ते शहराच्या बाबतीत नाही, तर जिल्हा आणि तालुक्याच्या बाबतीत आहेत. शहराच्या नामकरण संदर्भात केंद्र शासनाचा जीआर निघालेला आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो'.

Imtiyaz Jaleel
Operation Kaveri : सुदानमध्ये 'ऑपरेशन कावेरी' सुरू, 500 भारतीयांना सुखरूप बाहेर काढलं

'केंद्र शासनाने हे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना गडबडीत नाव बदलण्याचा निर्णय घेतला, असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे आणि न्यायालयाचा जो काही निकाल येईल तो आम्हालाही आणि सर्वांनाही मान्य असेल, असं खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

बीआरएस पक्षाने छत्रपती संभाजी नगरमध्ये सभेचे आयोजन केले आहे. बीआरएस पक्ष हळूहळू राज्यात हातपाय पसरताना दिसत आहे. बीआरस पक्षाच्या छत्रपती संभाजी नगरमधील सभेवर भाष्य करताना खासदार इम्तियाज जलील म्हटले की, 'प्रत्येक राजकीय पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. चंद्रशेखर राव यांचा पक्ष महाराष्ट्रात येत आहे. त्यांचे आम्ही स्वागतच करतो. मात्र, त्यांनी महाराष्ट्राचे संस्कृती समजून घेऊन काम करावे'.

Imtiyaz Jaleel
HC On Aurangabad Name Change: औरंगाबादचे नाव सरकार दरबारी बदलू नका; मुंबई हायकोर्टाचे महत्वाचे निर्देश

'त्यांच्या इतका पैसा आमच्याकडे नाही, आमचा नेता आला की नाव ऐकूनच सभेला आपोआप गर्दी होते. आम्हाला अशा प्रकारे लोक जमवण्याची गरज नाही, असा टोलाही जलील यांनी लगावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com