औरंगाबादमधील हालचालींवर मला लक्ष द्यावे लागेल; राज ठाकरेंच्या सभेवर इम्तियाज जलील यांचे वक्तव्य

औरंगाबाद शहरात मोठ्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे त्याकडे मला लक्ष द्यायचे आहे. असंही खा.इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) म्हणाले.
Imtiaz Jalil
Imtiaz JalilSaam Tv

पुणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. राज ठाकरे यांनी गुढी पाडव्या दिवशी मनसे मेळावा घेऊन मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला होता. भोंग्यावरील कारवाईसाठी राज्य सरकारला ३ मेपर्यंतचा इशारा दिला होता. याचपार्श्वभूमीवर आता औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेवर राज्यभरातून प्रतिक्रीया येत आहेत. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनीही या सभेवर टीका केली आहे.

औरंगाबाद शहरात मोठ्या हालचाली सुरु आहेत. त्याकडे मला लक्ष दिले पाहिजे. मागिल दोन वर्षापूर्वी कोरोनामुळे काय परिस्थिती होती. कोरोनाच्या उइपचारासाठी आपण लढत होतो. आणि आता आपण त्या गोष्टींना विसरलो आहे. आणि आता आपण कोणत्या विषयावर चर्चा करत आहे, भोंग्याच्या मुद्द्यावरुन खासदार जलील यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. सकाळ माध्यम समुहाच्या डॉक्टर सन्मान या कार्यक्रमात बोलताना जलील (Imtiaz Jalil) यांनी ही टीका केली आहे.

Imtiaz Jalil
Aurangabad | अमित ठाकरे औरंगाबादमध्ये, राज ठाकरेंच्या सभेला कोणकोणते नेते उपस्थित राहणार?

'आज आपण विचार करायला हवा, दोन वर्षपूर्वी आपण एका एका बेडसाठी लढत होतो. आपल्याला बेड मिळेल का? इंजेक्शन मिळेल का.? आम्हाला रेमडिसिव्हरसाठी लढावं लागत होतं. त्यावेळी हे इंजेक्शन जगातील सर्वात महाग बनले होते. विचार करा दोन वर्षापूर्वी काय परिस्थिती होती. मात्र आज आपण त्या मुद्यांना विसरलो आहोत, आणि कोणत्या मुद्यावर आपण चर्चा करत आहे, असंही खासदार जलील म्हणाले.

त्यामुळे यापुढे आपण विचार केला पाहिजे, या पुढील आयुष्य आपण समाजाच्या सेवेसाठी अर्पण केले पाहिजे. येणाऱ्या दोन दिवसात औरंगाबाद शहरात मोठ्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे त्याकडे मला लक्ष द्यायचे आहे. असंही खा.इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com