Gadchiroli: सामूहिक विवाह सोहळ्यात १६ नक्षलवाद्यांनीही बांधली लग्नगाठ

याच विवाह सोहळ्यात पोलीस दलाच्या पुढाकाराने 16 आत्मसमर्पित नक्षल जोडप्यांनीही लग्नगाठ बांधली.
Wedding ceremony
Wedding ceremonyसंजय तुमराम

गडचिरोली : गडचिरोलीत (Gadchiroli) आज आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्याचा उत्साह बघायला मिळाला. जिल्हा पोलीस दल आणि नागपूरच्या मैत्री परिवार संस्थेने हा भव्य सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला. आदिवासी समाजातील इच्छुक नव वर-वधूंना लग्नाचा अवाढव्य खर्च सोसावा लागू नये, यासाठीचा हा प्रयत्न सफल ठरला आहे. (Tribal mass marriage ceremony)

Wedding ceremony
ट्रेन पकडताना प्रवाशाचा गेला तोल, RPF कॉन्स्टेबलने वाचवले प्राण (पहा Video)

या कार्यक्रमात 10 हजार आदिवासी बांधवानी सहभाग घेतला. 2 विशाल मंडपात एकूण 119 जोडप्यांनी आयुष्याच्या जोडीदारासह नव्या आयुष्याची सुरुवात केली. याच सोहळ्यात पोलीस दलाच्या पुढाकाराने 16 आत्मसमर्पित नक्षल (Naxals) जोडप्यांनीही लग्नगाठ बांधली. हा सोहळा गडचिरोलीच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा व लक्षवेधी कार्यक्रम ठरलाय. अतिसंवेदनशील व मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समाजासाठी असे विवाह सोहळे गरजेचे असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com