सिंधुदुर्गमधील 'या' गावात साजरा केला जातो; 'एक गाव एक गणपती'

लग्न पत्रिके मध्ये गणपतीचे चित्र छापलं जात नाही कारण...
सिंधुदुर्गमधील 'या' गावात साजरा केला जातो; 'एक गाव एक गणपती'
सिंधुदुर्गमधील 'या' गावात साजरा केला जातो; 'एक गाव एक गणपती'अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : तळकोकणात गणेश चतुर्थीला (Ganesh chaturthi) प्रत्येक घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापणा करण्याची परंपरा आहे पण सिंधुदुर्गातल्या (Sindhudurg) एका गावामध्ये संपुर्ण गावामध्ये एकच गणपती बसविण्याची प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे.

सिंधुदुर्गातील मालवण (Malvan) तालुक्यातील कोईल गावात ‘एक गाव एक गणपती’ अशी पारंपरिक पद्धत आहे. विशेष म्हणजे तळकोकणात प्रत्येक गावागावात घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो.मात्र या गावामध्ये ग्रामदैवतच "गणपती" आहे. या गावातील गणपती मंदिरात काळ्या दगडाची गणेशमूर्ती आहे त्यामुळे हीच गणेशमुर्ती गणेशोत्सवाच्या काळात सजविली जाते. घरोघरी गणेशाचे पूजन न करता गणेश मंदिरात सर्वजण एकत्रित येऊन गणेश चतुर्थी साजरी करतात. गणेश चतुर्थी घरोघरी साजरी केली जात नाही. गावांमध्ये साडे सहाशे ते सातशे वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे गणेश उत्सव काळामध्ये 80 ते 90 घरही एकत्र येऊन गणेश उत्सव भक्तिभावाने एकमताने साजरा केला जातो त्यामध्ये संपूर्ण गावांमध्ये फिरून शिधा गोळा केला जातो त्याच शिधामधून गणेश चतुर्थीच्या काळामध्ये सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जातो गणेश चतुर्थीच्या काळामध्ये घरामध्ये कोणतीही मूर्ती किंवा प्रतिमा लावली जात नाही मात्र नशिक सत्यनारायणाची पूजा मंदिरामध्ये केली जाते. (In a village in Sindhudurg, only one Ganpati is celebrated)

हे देखील पहा-

लग्न पत्रिके मध्ये गणपतीचे चित्र छापलं जात नाही

विशेष म्हणजे लग्न पत्रिके मध्ये गणपतीचे चित्र (Ganesh Picture) छापलं जात नाही त्यामुळे काही लोकांचा गैरसमज होतो की ही लोकं गणपतीला मानत नाही 'तस नाही तर' आमचं एक श्रद्धास्थान अस आहे की, गणराया चा विघ्नहर्ता म्हणून एक लौकिक आहे त्याचं कुठेही विटंबना होता नये त्याचं पावित्र्य राखले गेले पाहिजे असं मत तिथल्या स्थानिक ग्रामस्थांचा आहे दर काही ठिकाणे प्रतिमा किंवा गणपतीच्या मूर्तीचा गैरवापर होत असेल तर आम्ही निषेध व्यक्त करतो अशी माहिती मंडळाच्या अध्यक्ष नामदेव साटम यांनी दिली.

या गावांमध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो त्यानंतर कामानिमित्त आम्ही मुंबईला गेलो तरी गणेश चतुर्थीला आमच्या गावी येण्याचे एक आस आम्हाला लागलेली असते किंवा आम्हाला एका त्रास दिवस यायला मिळालं नाही तरी आमचे याठिकाणी कंटिन्यू फोन असतात गणेश चतुर्थीच्या आधी आठ ते पंधरा दिवस रंगरंगोटी सजावट केली जाते शिधा दिला जातो अकरा दिवस मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो या 11 दिवसांच्या कालावधीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम (Cultural events) भजने काही गावांमध्ये वही वाटपचा देखील रक्तदान शिबिर असे उपक्रम हाती घेतले जातात असे विविध कार्यक्रम केले जातात.

सिंधुदुर्गमधील 'या' गावात साजरा केला जातो; 'एक गाव एक गणपती'
उल्हासनगर मध्ये मुस्लिम तृतीयपंथीयाने केली गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना

इतर गावांमध्ये प्रत्येक घरामध्ये गणपतीचं आगमन होत असतो पण मात्र आमच्या गावांमध्ये मंदिरा मध्येच गणेश चतुर्थी साजरी केली जाते गेले अनेक वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे एक गाव एक गणपती त्याच प्रमाणे युवापिढी ही त्याच परंपरेप्रमाणे गावामध्ये चालवत आहे ज्या पद्धतीने मागच्या पिढीने परंपरेनुसार सांभाळत आले त्याच पद्धतीने आम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून ही परंपरा कायम जोपासणार आहोत घरगुती गणपती पेक्षा आम्हाला एकत्र येऊन या ठिकाणी सार्वजनिक गणपती उत्सव आम्ही साजरा करतो आम्हाला खूप आनंद वाटतो अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.

दरम्यान गावाच्या एकात्मतेसाठी सर्व गावांनी एक गाव एक गणपती या परंपरेचा आदर्श घ्यायला काहीच हरकत नाही

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com