अकोल्यात 46 हजार नागरिकांनी मुदत संपूनही लसीचा दुसरा डोस घेतलाच नाही...
अकोल्यात 46 हजार नागरिकांनी मुदत संपूनही लसीचा दुसरा डोस घेतलाच नाही...Saam Tv News

अकोल्यात 46 हजार नागरिकांनी मुदत संपूनही लसीचा दुसरा डोस घेतलाच नाही...

मुदत संपूनही अकोला जिल्ह्यातील सुमारे 46 हजार 383 लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला नसल्याची माहिती समोर आली आहे.

अकोला: कोरोनाची दुसरी लाट आली आणि सर्वांमध्ये कोरोनाची धास्ती निर्माण झाली. त्यामुळे अनेकांनी लसीचा पहिला डोस घेण्याची मोठी घाई केली होती. लांबलचक रांगांमध्ये उभे राहून पहिला डोस घेतला, मात्र आता मुदत संपूनही अकोला जिल्ह्यातील सुमारे 46 हजार 383 लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला नसल्याची माहिती समोर आली आहे. (In Akola, 46,000 citizens did not take the second dose of vaccine even after the deadline)

हे देखील पहा -

कोरोनापासून बचावासाठी नागरिकांनी लस घ्यावी, असे प्रशासनाकडून आणि सरकारकडून आवाहन केले जाते. सध्या मात्र लसीच्या दुसऱ्या डोससाठी कुणाला कंटाळा, तर कोणाची बेफिकरी होताना दिसून येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण जास्त होते. अनेकांना बेड न मिळाल्याने मृत्यूचा आकडाही वाढला होता. त्यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी भीतीपोटी अनेकांनी लस घेण्याकरिता धावपळ केली होती. मध्यरात्रीनंंतर लोक लसीकरण केंद्राबाहेरच रात्र काढू लागले होते. आता मात्र कोविडचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने लसीकरणाकडे अनेकांनी पाठ केल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्यांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला, अशांना 84 दिवसांनंतर, तर कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना 28 दिवसांनंतर लसीचा दुसरा डोस घेणे अपेक्षित आहे. ही मुदत पूर्ण करूनही जिल्ह्यातील सुमारे 46 हजार 383 लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला नाही.

अकोल्यात 46 हजार नागरिकांनी मुदत संपूनही लसीचा दुसरा डोस घेतलाच नाही...
लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही फराह खान कोविड पॉझिटीव्ह

लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तुलनेने लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या रोजच्या अहवालात कमी दिसून येते. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य यंत्रणेमार्फत केले जात आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com