भाजपला मोठा धक्का ; बीडमध्ये एकाच दिवशी 11 तालुकाध्यक्षांसह 36 जणांनी दिले राजीनामे !

खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपदापासून डावलल्यानंतर बीडमधील कट्टर मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत. यामध्ये दोन जि.प. सदस्य आणि दोन पं.स.सदस्यांचा समावेश आहे.
भाजपला मोठा धक्का ; बीडमध्ये एकाच दिवशी 11 तालुकाध्यक्षांसह 36 जणांनी दिले राजीनामे !
भाजपला मोठा धक्का ; बीडमध्ये एकाच दिवशी 11 तालुकाध्यक्षांसह 36 जणांनी दिले राजीनामे !SaamTv

विनोद जिरे

बीड - खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना मंत्रीपदापासून डावलल्यानंतर बीडमधील कट्टर मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी कालपासून राजीनामासत्र सुरू केलं आहे. जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर, आज एकाच दिवशी 11 भाजपच्या तालुकाध्यक्षांसह 36 जणांनी राजीनामे दिले आहेत. In Beed, 36 BJP Officials including 11 taluka presidents resigned on the same day!

यामध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सविता गोल्हार, सविता बडे पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर, लक्ष्मी लोखंडे तसेच किन्ही गावचे विद्यमान सरपंच राहुल काकडे, महादेव लटपटे यांच्यासह विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

भाजपला मोठा धक्का ; बीडमध्ये एकाच दिवशी 11 तालुकाध्यक्षांसह 36 जणांनी दिले राजीनामे !
Corona | अलिबाग तालुक्यातील 36 गावे बनली कोरोना हॉटस्पॉट !

दरम्यान एकाच दिवशी राजीनामे दिल्याने, भाजपला बीडमधून हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. राज्यभरातून देखील भाजपमधील मुंडे समर्थक मोठ्या प्रमाणावर राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र बीडमधील या राजीनाम्यांनी भाजपची बीड जिल्हा बॉडी बरखास्त होण्याच्या मार्गावर असून यावर आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार ? याकडं राजकीय वर्तुळातून लक्ष लागलं आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com