बुलढाण्यात काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची चुरस वाढली!

अखेर काँग्रेसचा (Congress) नवीन कारभारी ठरण्याची चिन्हे दृष्टीपथात आली आहेत. उच्चपदस्थ पक्षसूत्रांनुसार जुलैअखेर हा गुंता सुटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
बुलढाण्यात काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची चुरस वाढली!
बुलढाण्यात काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची चुरस वाढली!संजय जाधव

बुलढाणा: अखेर काँग्रेसचा (Congress) नवीन कारभारी ठरण्याची चिन्हे दृष्टीपथात आली आहेत. उच्चपदस्थ पक्षसूत्रांनुसार जुलैअखेर हा गुंता सुटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्य विधिमंडळाचे लघु अधिवेशन आटोपले असून, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या बहुप्रतिक्षित दिल्ली दौऱ्यात जिल्हा काँग्रेसच्या नेतेपदावर शिक्कामोर्तब होईल. जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा, २ नगरपंचायतींच्या निवडणुका येत्या डिसेंबरच्या आसपास होणार आहे.

त्यापाठोपाठ पुढील वर्षीच्या प्रारंभी जिल्हा परिषद व १३ पंचायत समित्यांचा रणसंग्राम रंगणार आहे. यामुळे जिल्हाध्यक्ष पदाचा फैसला तातडीने करणे गरजेचे आहे. यामुळे अजूनही काँग्रेस पक्षातच नव्हेतर राजकीय क्षेत्रातही मानाचे पद समजले जाणाऱ्या या पदाच्या नियुक्तीसाठी काँग्रेस वर्तुळात लगीनघाई चालली आहे.

बुलढाण्यात काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची चुरस वाढली!
सांगलीत पेट्रोल गॅस दरवाढी विरोधात महिला काँग्रेसची सह्यांची मोहीम

अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी “एक अनार दस बिमार' अशी मजेदार स्थिती आहे. विद्यमान अध्यक्ष राहुल बोंद्रे रिपीट होण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र राष्ट्रीय पातळीवर तीन वर्षे झालेल्यांना बदलायचेच, असा निर्णय झाल्याने त्यांना डच्चू मिळणे क्रमप्राप्त ठरले आहे. अॅड. विजय सावळे, जि.प. सदस्या जयश्री शेळके, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ ही नावे अंतिम निवडीसाठी पॅनलमध्ये असल्याची माहिती आहे.

याशिवाय इच्छुकांची यादी जरी मोठी असली तरी पक्ष पातळीवर काम करणारा सक्षम नेत्यांची निवड होणार असल्याचेही बोलले जात आहे. तसेच जिल्ह्यात प्रथमच अध्यक्ष पदाची धुरा एका महिलेच्या हातात दिल्या जाणार असल्याने कार्यक्रत्यामद्धे आनंदाची उत्सुकता वाढली आहे. राष्ट्रीय व राज्य स्तरावरील पदाधिकारी या शर्यतीत उतरल्याने पदासाठीची व गटातटातील चुरस, राजकारण, किती तीव्र आहे हे स्पष्ट होत आहे. त्यातच मुकुल वासनिक विरोधी गटाने नेमके याचवेळी हालचाली सुरू केल्याने निवडीतील गुंतागुंत वाढली आहे.

भावी निवडणुका तोंडावर आल्याने पक्ष श्रेष्ठींना जुलै अखेरपर्यंत निर्णय घेणे कर्मप्राप्त आहे. नविन अध्यक्षांना अभ्यास, दौरे, संपर्क, नवीन नियुक्त्या व भावी लढतीचे नियोजन करण्यासाठी अधिक कालावधी मिळणे आवश्यक आहे. यामुळे स्वबळाची भाषा बोलणारे नाना पटोले लवकरच दिल्ली गाठून पक्षश्रेष्ठी आणि जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा मुकुल वासनिक यांच्या संमतीने अध्यक्षपदाचा फैसला करतील.

ज्यांना मोठे केले त्यातील काही जण बंडाची भाषा करायला लागल्याने व गुप्त बैठका घेण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याने वासनिकांनाही निवड करताना यंदा थोडी जास्तच डोकेदुखी राहणार आहे. मेहनतीने उभी केलेली जिल्हा काँग्रेस धूर्त राजकारणी समजले जाणारे व कोटिल्यनीती कोळून प्यालेले वासनिक हितशत्रुच्या हाती जाऊ देतील असे शक्यच नाही.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com