दोन मुलींची लग्न, डोक्यावर बचत गटाचे कर्ज, आर्थिक विवंचनेतून शेतमजुराने उचललं टोकाचं पाऊल

शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे राहणारे संजय पैसोडे हे त्यांच्याकडे शेती नसल्याने मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वांह करीत होते.
Buldhana Farm labor
Buldhana Farm laborसंजय जाधव

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात एका शेतमजुराने कर्जाला कंटाळून आपलं जीवन संपवलं आहे. आत्महत्या केलेल्या शेतमजुरावर बचत गटाचे कर्ज होते. शिवाय घरात दोन मुलींची लग्न बाकी असल्याने त्यांला आर्थिक चिंता सतावत असल्याने त्यांने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती समोर येत आहे.

कर्जबाजारी मुळे अनेक शेतकऱ्यांनी (Farmer) आपलं जीवन संपवल्याच्या बातम्या आपण वाचत असतो. तसंच शेती नसल्याने दुसऱ्यांच्या शेतात मजुरीने जाणाऱ्या एका शेजमजुराने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुलढ्याण्यात (Buldhana) घडली आहे. संजय प्रल्हाद पैसोडे वय वर्ष ४६ असं आत्महत्या केलेल्या शेतमजुराच नावं आहे. संजय यांनी पुरुषोत्तम चांडक यांच्या मालकीच्या मळ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे राहणारे संजय पैसोडे हे त्यांच्याकडे शेती नसल्याने मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वांह करीत होते. कुटुंब मोठे असल्यामुळे त्यांनी खर्चासाठी बचत गटाचे कर्ज घेतले होते, बचत गटाचे कर्ज याशिवाय घरी असणाऱ्या दोन मुलींचे लग्न बाकी असल्याने त्यांना आर्थिक चिंता सतत सतावत होती.

हे देखील पाहा -

त्यामुळे मुलींचे लग्न (Marriage) कशी करायची आणि कर्ज कसं फेडायचं या चिंतेतुनचं संजय पैसोडे यांनी पुरुषोत्तम चैनसुख चांडक यांच्या मळ्यातील निंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच जलंब पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी जलंब पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com