Sambhaji Nagar News: प्रेमाच्या जाळ्यात अडकल्या १७७ अल्पवयीन मुली; कारण समजलं तर तुम्हालाही बसेल धक्का

ज्यांची मुलं 18-20 वर्षाखालील आहेत, त्या पालकांनी आता आपल्या मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
Sambhaji Nagar News
Sambhaji Nagar NewsSaam Tv

Sambhaji Nagar News: ज्यांची मुलं १८-२० वर्षाखालील आहेत, त्या पालकांनी आता आपल्या मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. सध्या पालकांसोबतचा संवाद कमी झाल्याने अल्पवयीन मुले ही वेगळ्याच मार्गाला लागतायत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ९ महिन्यांत १७७ अल्पवयीन मुली प्रेमाच्या जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यात आले. अशा मुलींची संख्या १७७ इतकी आहे. जून २०२२ ते मार्च २०२३ या नऊ महिन्यांत पॉक्सो आणि अपहरणाचे प्रत्येकी पन्नास टक्के गुन्हे दाखल करण्यात आले. (Latest Marathi News)

Sambhaji Nagar News
Morcha To Oppose Barsu Refinery : 'रिफायनरी हटवा काेकण वाचवा'; काेकणात वाड्यांवर रिफायनरी विराेधकांचा माेर्चा

या मुली अल्पवयीन असल्यामुळे त्यांना बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. समिती प्रारंभी अशा मुलींना बालगृहात ठेवते. त्यांचे समुपदेशन करून पुन्हा पालकांच्या ताब्यात दिले जाते. या मुली एक ते दहा दिवसांपर्यंत साथीदारासोबत होत्या. अल्पवयीन मुलींची मुलांसोबतची प्रेमप्रकरणे वाढत आहेत.

पालक आणि मुलांचा संवाद दिवसेंदिवस कमी होत असल्याने मुली मुलांसोबत पळून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. बऱ्याच प्रकरणात मुलींना फूस लावून पळवणे, मुली स्वत:हून मुलांसोबत निघून जाणे आदी प्रकार घडतात. अठरा वर्षांखालील मुली कुठल्यातरी कारणाने घरातून निघून गेल्यानंतर पोलिसात तक्रार दिली जाते.

अनेक प्रकरणे कुटुंबात माहीत असतात, परंतु बऱ्याच प्रकरणात पालकांना मागमूसही नसतो. पोलिसात तक्रार दिल्यानंतर तपासा करून पोलीस (Police) अल्पवयीन मुलीस बालकल्याण समितीसमोर हजर करतात. अनेक प्रकरणांत पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होतो. उर्वरित प्रकरणांत मुलांवर अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. (Maharashtra News)

Sambhaji Nagar News
Bribe Trap: ठेकेदाराकडून बिल काढण्यासाठी लाच; एक लाखांचा पहिला हप्ता घेताना स्वच्छता निरीक्षकाला अटक

आई-वडिलांचा मुलांशी नसलेला भावनिक संवाद यातून अल्पवयातच मुली रोप्रेमाच्या जाळ्यात अडकतात. घरात आनंदी वातावरण आणि कौटुंबिक सौहार्द ठेवणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांच्या आवडीनिवडीची काळजी घ्यावी. शिक्षिकांनीही मुली शाळेत काय करतात याची माहिती पालकांना द्यावी. शेजाऱ्यांनादेखील मुलगी कुठे दिसली तर पालकांना कळवावे. म्हणजे मुली चुकीच्या मार्गाला जाणार नाहीत. (Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com