हिंगोलीत एकास जुन्या वादावरुन चाकुने भोसकले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील गवळीपूरा भागातील सचिन ऊर्फ पिंटू बालगुडे हे सोमवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उभे होते.
हिंगोलीत एकास जुन्या वादावरुन चाकुने भोसकले
हिंगोलीत एकाला भोसकुन केले गंभीर जखमी

राजेश दार्वेकर

हिंगोली : शहरात जून्या वादातून एकास चाकूने भोसकल्याची घटना सोमवारी ( ता. १३ ) सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान घडली आहे. जखमी युवकावर येथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेड येथे नेण्यात आले आहे. तर चाकु भोसकलेल्याचा पोलिस शोध घेत आहेत.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील गवळीपूरा भागातील सचिन ऊर्फ पिंटू बालगुडे हे सोमवारी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उभे होते. यावेळी तेथे शेख फेरोज हा तेथे आला. त्यानंतर त्या दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. या वादानंतर शेख फेरोज याने पिंटू यांच्या पाठीत चाकूचा वार केला त्यामुळे मोठा रक्तस्त्राव सुरु झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक पंडीत कच्छवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक कातमांडे, हवालदार गजानन होळकर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा - देशाचे माजी गृहमंत्री ( कै.) डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त बुधवार ( ता. 14 ) जुलै रोजी नांदेड महानगर काँग्रेस कमिटीच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

पोलिसांनी गंभीर जखमी असलेल्या पिंटू बालगुडे यास उपचारासाठी शासकिय रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी नांदेड येथील शासकिय रुग्णालयात हलविले आहे. या प्रकरणात पोलिसांनी शेख फेरोज याचा शोध सुरु केला आहे. जून्या वादातून झाल्याची शक्यता पोलिस व्यक्त करीत असून या प्रकरणी रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला.

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com