हिंगोलीत चक्क भाजप आमदार प्रशासनाविरोधात बसले उपोषणाला!

रेती, दारू, गुटखा माफियांवर कार्यवाही करण्याची मागणी
हिंगोलीत चक्क भाजप आमदार प्रशासनाविरोधात बसले उपोषणाला!
हिंगोलीत चक्क भाजप आमदार प्रशासनाविरोधात बसले उपोषणाला! संदीप नागरे

संदीप नागरे

हिंगोली: राज्यभर ठाकरे सरकार State Government विरोधात भाजपने विविध आरोप करत आंदोलने सुरू केलेलं असताना आता जिल्हा पातळीवर देखील भाजप आमदारांनी अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी करत उपोषण सुरू केले आहे. हिंगोलीत भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे MLA Tanaji Mutkule यांनी , आज हिंगोली जिल्हा प्रशासनाविरोधात आमरण उपोषण सुरू केलं आहे.

जिल्ह्यात रेती, गुटखा व अवैध विक्री होणारी देशी दारू रोखण्याची मागणी यावेळी यांनी केली आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाने मात्र जिल्ह्यात कुठे ही अवैध व्यवसाय सुरू नसल्याचे सांगितले आहे, तसेच नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यास तातडीने कार्यवाही होणार असल्याचे पोलिसांनी प्रसिद्धी पत्रक काढून म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com