हिंगोली जिल्ह्यात आई, मुलगा पाण्यात वाहून गेले; शोधकार्य सुरु
काम पुरात वाहून गेल्याने माता व चिमुकला बेपत्ता

हिंगोली जिल्ह्यात आई, मुलगा पाण्यात वाहून गेले; शोधकार्य सुरु

कार्यक्रम आटोपून ते कोंडसी (असोला) मार्गे औरंगाबादला निघाले. यावेळी चालकाला (योगेश) ओढ्याला आलेल्या पाण्याचा आंदाज आला नाही.

औंढा नागनाथ ( जिल्हा हिंगोली ) : तालूक्यातील कोंडसी (असोला ) येथील ओढ्यातील पाण्याचा अंदाज चालकाला न आल्याने आई व मुलगा पाण्यात वाहून गेल्याची घटना रविवारी (ता. ११) रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान घडली.

औंढा नागनाथ तालुक्यातील शेळके (पोटा ) येथे रामदास शेळके, वर्षा योगेश पडोळ, योगेश पडोळ व त्यांचा मुलगा श्रेयस हे चार जण कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रम आटोपून ते कोंडसी (असोला) मार्गे औरंगाबादला निघाले. यावेळी चालकाला (योगेश) ओढ्याला आलेल्या पाण्याचा आंदाज आला नाही.

हेही वाचा - गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा काळ्या आईची ओटी भरुन पावसासाठी आभाळाकडे नजरा लावून देवा दुबार पेरणीचे तर संकट आमच्यावर येणार नाही ना ? या चिंतेत प्रत्येक शेतकरी होता.

या दरम्यान वर्षा पडोळ, श्रेयस पडोळ हा सात वर्षाचा मुलगा पाण्यात वाहून गेले. रामदास शेळके चालक योगेश यातून बाहेर आले. दरम्यान, तहसीलदार कृष्णा कानगुले, सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे वाहून गेलेल्या आई आणि सात वर्षाच्या मुलाचा शोध घेत आहेत. रात्री उशीरापर्यत हे शोधकार्य सुरूच होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com