12 तासांच्या आत पोलिसांनी लावला लाखो रुपयांच्या चोरीचा छडा; आरोपीला अटक
12 तासांच्या आत पोलिसांनी लावला लाखो रुपयांच्या चोरीचा छडा; आरोपीला अटकSaamTV

12 तासांच्या आत पोलिसांनी लावला लाखो रुपयांच्या चोरीचा छडा; आरोपीला अटक

12 तासाच्या आत पोलिसांनी आरोपीकडील जवळपास एकूण ५ लाख ४८ हजार २४० रुपयाचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.

लातुर : शहरात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत असतानाच शस्त्राचा धाक दाखवुन चोरी करणाऱ्या आरोपीस १२ तासाच्या आत अटक करत गुन्ह्यातील एकूण ५ लाख ४८ हजार २४० रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याने लातुर पोलिसांच्या (Latur Police) कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हे देखील पहा -

लातुर शहरात पुण्यातून आलेल्या 32 वर्षीय रिंकेश चंपालालजी सोनी या व्यापाऱ्यांने लातूर शहरात येत असताना त्याच्याजवळ सोन्याचे दागिने व रोख रक्कम २५ हजार होती ते त्यांच्या लॉजकडे पायी चालत जात असताना त्याचेवर पाळत ठेवून असणाऱ्या एका इसमाने रात्री सव्वा आठच्या दरम्यान कामदार रोडवरील जावाई कापड दुकानाजवळ रिव्हालव्हर सारख्या हत्याराचा धाक दाखवुन सोनी यांच्या जवळील बॅग हिसकावून घेत दुचाकीवरुन पसार झाला.

12 तासांच्या आत पोलिसांनी लावला लाखो रुपयांच्या चोरीचा छडा; आरोपीला अटक
संतापजणक : मैत्रीणीचा नंबर देण्यास नकार दिल्याने पोलिसाने तरुणासोबतच ठेवले शारिरीक संबंध; गुन्हा दाखल

याबाबत व्यापारी रिंकेश चंपालालजी सोनी यांच्या फिर्यादीवरुन गांधी चौक पोलीस ठाण्यात (Gandhi Chowk Police Station) गुन्हा दाखल झाला होता पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुराग जैन लातूर आणि पोलीस उप विभागीय अधिकारी जितेंद्र जगदाळे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या विशेष पथकाने १२ तासाच्या आत सदर गुन्हयातील आरोपी रामेश्वर ऊर्फ पाप्या सुर्यकांत बजगुडे रा. जुना औसा रोड लातूर आणि एक अल्पवयीन बालक असे निष्पन्न करुन त्यांना ताब्यात घेतले आणि गुन्ह्या संबधात विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा कबुल केला.

सदर गुन्हयातील आरोपी रामेश्वर ऊर्फ पाप्या सूर्यकांत बजगुडे आणि अल्पवयीन बालकास ताब्यात घेवून त्याला बाल न्यायालय, लातूर येथे हजर केले असून आरोपीकडील जवळपास एकूण ५ लाख ४८ हजार २४० रुपयाचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com