नागपूर: मुलीच्या मदतीने केली पतीची हत्या! आत्महत्येचा कांगावा अन्...

नागपूरच्या पारडी पोलीस स्टेशन हद्दीत पत्नीने अल्पवयीन मुलीच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय.
पारडी पोलीस ठाणे, नागपूर
पारडी पोलीस ठाणे, नागपूरसंजय डाफ

संजय डाफ

नागपूर : नागपूरच्या पारडी पोलीस स्टेशन हद्दीत पत्नीने अल्पवयीन मुलीच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. पाच दिवसांपूर्वी  मृतक धर्मेंद्र गजभिये याचं पत्नी निशा सोबत कडाक्याचे भांडण झालं होत. त्यावेळी संतापलेल्या पत्नी निशानं तिच्या अल्पवयीन मुलीच्या मदतीने धर्मेंद्रचा गळा आवळून हत्या केली. मात्र, पत्नीकडून हा आत्महत्या असल्याचा बनाव रचण्यात आला पण चौकशीत पत्नीचा डाव उघड झाला. याप्रकरणी पोलिसांनी (Police) महिलेला अटक केली आहे. (Nagpur Crime News)

पारडी पोलीस ठाणे, नागपूर
नागपूरात सराफा लुटमार प्रकरणाचा पर्दाफाश; भाजयुमो कार्यकर्त्यासह 6 अटकेत

धर्मेंद्र नरेश गजभिये (वय 40) हा ट्रकचालक होता. यामुळे तो सतत बाहेरगावी असायचा. त्याला दारूचे व्यसन होते. घरी आल्यानंतर तो पत्नी आणि 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असे. त्यामुळे पत्नी निशा (वय 36) सोबत सतत वाद होत होते. धर्मेशने घरी सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) लावले होते. यामुळे बाहेरगावहून आल्यानंतर तो फुटेज तपासायचा आणि भांडण त्यांच्याशी करायचा. माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांपासून वाद सुरू होते. सहा दिवसापूर्वी म्हणजेच 11 एप्रिलला धर्मेंद्र घरी आल्यानंतर रात्री पती-पत्नीत जोराचे भांडण झाले या भांडणात दोघांनीही एकमेकांना जबर मारहाण केली. मद्यधुंद असलेल्या पतीला पत्नी निशाने खाली पाडले. छातीवर लाथ ठेवत त्याच्या गळ्याभोवती फास आवळला. पत्नी आणि मुलीने फास जोरात आवळल्याने धर्मेंद्रचा मृत्यू झाला होता.

हे देखील पहा-

मात्र, नवऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची तक्रार निशाने पारडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र हे प्रकरण संशयास्पद वाटत असल्यानं पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर धर्मेंद्र याने आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाल्याचं स्पष्ट होताचं पारडी पोलिसांनी निशाला अटक केली. तर तिच्या अल्पवयीन मुलीला बाल सुधार गृहात पाठवण्यात आलंय. निशाचा नवरा हा ट्रक ड्राइव्हर असल्याने तो सलग आठ/दहा दिवस बाहेर राहायचा. या दरम्यान निशाचे बाहेर सूत जुळले होते. याची कुणकुण धर्मेंद्रला लागल्यानं त्यांच्यात नेहमी वाद व्हायला लागले होते. त्यातूनच निशानं मुलीच्या मदतीने नवऱ्याची हत्या केल्याचा खुलासा झालाय. (Latest Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com