नांदेडमध्ये संतापलेल्या रणरागिणींकडून अवैध दारूचे 25 अड्डे उद्ध्वस्त

वारंवार विनंती करुनही दारू बंदीसाठी प्रशासन कुठलेही पाऊल ऊचलत नसल्याने वाशीच्या रणरागिणीं आक्रमक झाल्या आहेत.
नांदेडमध्ये संतापलेल्या रणरागिणींकडून अवैध दारूचे  25 अड्डे उद्ध्वस्त
नांदेडमध्ये संतापलेल्या रणरागिणींकडून अवैध दारूचे 25 अड्डे उद्ध्वस्त Saam Tv

संतोष जोशी

नांदेड : हिमायतनगर (Himayatnagar) तालुक्यातील वाशी (Washi) गावातील रणरागिणींचा रौद्र अवतार पहायला मिळाला. मुलांना सोबत घेऊन १०० ते १५० रणरागिणींनी हातभट्टीची दारू (Alcohol) तयार करणारे 25 अड्डे उद्ध्वस्त केले. दारूच्या आहारी गेल्याने गावातील अनेकांचा मृत्यू झालाय. शिवाय अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. वारंवार विनंती करुनही दारू बंदीसाठी प्रशासन कुठलेही पाऊल ऊचलत नसल्याने वाशीच्या रणरागिणीं आक्रमक झाल्या आहेत. (In Nanded, 25 illegal liquor dens were demolished by angry women)

नांदेडमध्ये संतापलेल्या रणरागिणींकडून अवैध दारूचे  25 अड्डे उद्ध्वस्त
डॉ. भागवत कराड हे मंत्रीपदाची शपथ घेताना जल्लोष केल्याने कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

दरम्यान, महिलांनी घेतलेल्या रौद्ररूपामुळे हातभट्टीची दारू तयार करणारे आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्येही चांगलीच खळबळ उडाली आहे. याबाबत वाशीच्या महिला सरपंच शिल्पा राठोड यांनी पुढाकार घेतलाय. हातभट्टीची दारू पिल्यानं आज पर्यंत अनेकांचा मृत्यू झालाय. अनेकांनी दारु पिऊन विष घेऊन आत्महत्या केली. मोठे तर सोडा ते १० वर्षापासूनचे मुलंही दारुच्या आहारी गेले असल्याची धक्कादायक माहिती शिल्पा राठोड यांनी दिली आहे.

तर आपल्या आपल्या पतीने दारु पिऊन आत्महत्या केली असल्याचे गावातील माहीला कल्पना राठोड यांनी यांनी सांगितले आहे. आता गावात दारु तयार करणे आणि दारू विक्री बंद झाली नाही तर कायदा हातात घेऊन कडक पाऊल ऊचलण्याचा इशारा वाशीच्या रणरागिणींनी प्रशासनाला दिलाय. त्यामुळे प्रशासन काय दखल घेते का हे महत्वाचे ठरणार आहे.

Edited by- Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com