सांगलीत पार पडलं श्वानाचं बारसं; स्नेही, आप्तजनांसह प्राणीमित्रांना आमंत्रण

हौसेला मोल नसतं असं म्हणतात त्याचाच प्रत्यय सांगलीच्या (Sangli) कुपवाड येथील प्राणीप्रेमी जमुना पाटील यांच्या घरी आला आहे.
सांगलीत पार पडलं श्वानाचं बारसं; स्नेही, आप्तजनांसह प्राणीमित्रांना आमंत्रण
Sangli News Updatesविजय पाटील

सांगली : हौसेला मोल नसतं असं म्हणतात त्याचाच प्रत्यय सांगलीच्या (Sangli) कुपवाड येथील राजारामबापू हौसिंग सोसायटी येथील प्राणीप्रेमी जमुना पाटील यांच्या घरी आला आहे. पाटील यांच्या कुटुंबियांनी लॅब्रोडार जातीच्या कुत्र्याच्या पिल्लाचे (Puppy) चक्क बारसं घातलं आहे. कुपवाड मध्ये हा श्वानाचा अनोखा नामकरण सोहळा (Naming Ceremony) पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

जमुना पाटील या स्वतः प्राणी आणि पक्ष्यांना सांभाळतात, आजवर त्यांनी शेकडो कुत्र्यांना आणि मांजरांना (Dogs And Cats) जीवदान दिलं आहे. प्राण्यांवर दया करा, त्यांना मायेची वागणूक द्या, योग्य अन्न द्या याबाबत कायम जनजागृती पाटील या करत असतात. टाळेबंदीच्या (Lockdown) काळात सैरभैर झालेल्या बेवारस कुत्र्यांसह मांजरांना पदरमोड करून त्यांनी खाऊ घातले होते यावरुन त्यांच्याप्रती असलेल्या भुतदयेचा प्रत्यय दिसून येतो.

हे देखील पाहा -

स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी त्या त्ंयाच्या परिसरातील कुत्र्यांना गोडधोड जेवू घालतात, व्यवसायाने ब्यूटी पार्लर चालक असलेल्या जमुना यांनी नवजात श्वानाचे 'बेला' असे नामकरण केले आहे. त्यानिमित्त रंगलेल्या सोहळ्यात स्नेही, आप्तजन, शेजाऱ्यांना आमंत्रित करून याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवण्याची संधी दिली..

दरम्यान, हा नामकरण सोहळा करायचा म्हणून न करता तर आपल्या घरातील सदस्यांप्रमाणे त्यांनी घराची सजावट केली होती. शिवाय बेलासाठी खास बेड, पाळणा, खेळणी, कपडे आणले होती. फुलांच्या घड्या घालत स्वागतही जोरदार करण्यात आलं. शिवाय रितीरिवाजाप्रमाणे रंगलेल्या या सोहळ्याला प्राणी मित्र अजित काशिद, संतोष पाटील, पलवी पाटील, वेदिका पाटील, अभिजित शिद्धि यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com