धक्कादायक | सांगलीमध्ये पूर्ववैमनस्यातून दिवसाढवळ्या तरुणाची हत्या

विट भट्टी कामगाराचा निर्घृण खून केला आहे.
धक्कादायक | सांगलीमध्ये पूर्ववैमनस्यातून 
दिवसाढवळ्या तरुणाची हत्या
धक्कादायक | सांगलीमध्ये पूर्ववैमनस्यातून दिवसाढवळ्या तरुणाची हत्याविजय पाटील

सांगली : पूर्ववैमनस्यातून एका विट भट्टी कामगाराचा निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विक्रम वाघमारे असे या तरुणाचे नाव असून सांगली नजीकच्या हरिपूर येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी Sangli Rural Police काही संशयितांना ताब्यात घेतलं आहे.(In Sangli Murder of a young man in broad daylight)

हे देखील पहा -

सांगली नजीकच्या हरिपूर Haripur येथे शनिवारी दुपारच्या सुमारास विक्रम वाघमारे या विट भट्टी कामगाराचा निर्घृण खून करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती प्रमाणे हरिपूर येथील विक्रम वाघमारे Vikram Waghmare पिंपरी नामा तरुणाचा गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. सदर प्रकरणी न्यायालयात खटला सुरू असून,हा खटला मागे घे, यासाठी विक्रम वाघमारे यांनी पिंपळे याच्या घरासमोर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास जाऊन दारू पिऊन दंगा केला होता आणि या नंतर शनिवारी दुपारच्या सुमारास विक्रम वाघमारे यांचा धारदार शस्त्राने निर्घुण खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

धक्कादायक | सांगलीमध्ये पूर्ववैमनस्यातून 
दिवसाढवळ्या तरुणाची हत्या
महाविकास आघाडी सरकारने OBC समाजाच्या पाठीत खंजीर खूपसला; योगेश टिळेकरांचा आरोप

या घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे तर या खूना प्रकरणी काही संशयितांना सांगली ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com