CCTV Footage : सोलापुरात डॉक्टरची मुजोरी, वयोवृद्ध व्यक्तीला फायबर रॉडने बेदम मारहाण

प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. संदीप आडके असं मारहाण केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.
Solapur News
Solapur News Saam TV

>> विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापुरातील एका प्रतिष्ठित डॉक्टरने क्षुल्लक कारणावरुन एका वयोवृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत संबंधित व्यक्तीला हाताला टाके देखील पडले आहे. मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. संदीप आडके असं मारहाण केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. तर विजय चौधरी असं गवंडी कामगार असलेल्या पीडित व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय हे रस्त्यावरुन जात असताना डॉक्टर आडकेच्या हॉस्पिटलमधून त्यांच्या अंगावर कुणीतरी खरकटे पाणी टाकले. विजय यांनी याबाबत हॉस्पिटलमध्ये जात डॉक्टरांना जाब विचारला. मात्र संतापलेल्या डॉक्टरने विजय यांना फायबर काठीने बेदम मारहाण केली. डॉक्टरकडून झालेल्या मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (Latest Marathi News)

Solapur News
Earthquake in Delhi : राजधानी दिल्ली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली; आठवड्यातील दुसरी घटना

विजय चौधरी यांनी याबाबत सदर बाजार पोलिसात तक्रार दाखल केली आहे. डॉक्टर संदीप आडके विरोधात कलम 323, 324 504, 506 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरांनी केलेल्या मारहाणीत विजय चौधरी यांच्या हाताला पाच टाके पडल्याची माहिती मिळत आहे.

Solapur News
Breaking News : सोलापुरात अग्नीतांडव; यंत्रमाग कारखान्याला लागली भीषण आग

दरम्यान संदीप आडकेने देखील पीडित विरोधात सदर बाजार पोलिसात तक्रार दाखल केली. हॉस्पिटलमध्ये दारू पिऊन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप मारहाण करणाऱ्या डॉक्टरने केला आहे. त्याचबरोबर डॉक्टरच्या फिर्यादीवरून पीडित गवंडी कामगार विजय चौधरी यांच्या विरोधातही अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com