सोलापुरात कारहुणवी सणाने कोरोनाचे नियम बसवले धाब्यावर

गावात बेखौफपणे बैलगाडा शर्यत आणि बैलांच्या हलग्या लावून मिरवणूक काढण्यात आल्या आहेत.
सोलापुरात कारहुणवी सणाने कोरोनाचे नियम बसवले धाब्यावर
सोलापुरात कारहुणवी सणाने कोरोनाचे नियम बसवले धाब्यावरविश्वभुषण लिमये

विश्वभुषण लिमये

सोलापूर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात अद्याप कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत नाही आहे. त्यात आज अक्कलकोट Akkalkot तालुक्यातील करजगी या गावात कारहुणवी या बैलांच्या सणानिमित्त कोरोनाचे Corona सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. गावात बेखौफपणे बैलगाडा शर्यत आणि बैलांच्या हलग्या लावून मिरवणूक काढण्यात आल्या आहेत. In Solapur the festival laid down the rules of corona

यावेळी कोणाच्या ही तोंडाला मास्क नव्हता, सोशल डिस्टन्सचे तीनतेरा वाजले होते आणि मोठ्या संख्येने नागरिक हुल्लडबाजी करताना पहायला मिळाले.

हे देखील पहा -

गतवर्षी ही कोरोनाच्या संसर्गामुळे हा सण साजरा करण्यात आला नव्हता. सोलापूर जिल्ह्यातील कर्नाटक सीमावर्ती भागात शेतकरी हा सण उत्साहाने साजरा करायचे. मात्र कोरोनाच्या सावटामुळे सर्व सणांवर निर्बंध आलेले आहेत.

सोलापुरात कारहुणवी सणाने कोरोनाचे नियम बसवले धाब्यावर
वाशिष्टी नदीवरील पूल वाहतूकीसाठी बंद करणार

सोलापूर ग्रामीण हे अद्याप शासन नियमानुसार लेव्हल तीन मध्ये येत असल्याने ग्रामीण भागातील निर्बंध ही शिथिल करण्यात आले आहेत.काल आलेल्या कोरोना अहवालानुसार सोलापूर ग्रामीण भागात ३९४ पॉसिटीव्ह रुग्ण आढळले आहेत तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात घालणाऱ्या अशा महाभागांवर प्रशासन करावी करणार का हे पाहणे महत्वाचे आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.