बैलजोडीवर वीज कोसळली; एक दगावला, दुसऱ्याचे दोन्ही पाय निकामी

ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यावर मोठं संकट ओढावलं आहे.
Lightning struck the Oxen
Lightning struck the OxenSaam Tv

वर्धा : कालपासून राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे गावशिवारातील फळपिकांचे नुकसान झालं आहे. या पावसादरम्यानच काल वर्ध्यात (Wardha) शेतात झाडाखाली बांधलेल्या बैलांच्या अंगावर वीज पडल्याने एका बैलाचा मृत्यू तर एक बैल गंभीर जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

आर्वी तालुक्यातील बोरखेडी(मदनी) शिवारात आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरच बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यावर मोठं संकट ओढावलं आहे. शिवाय दुसरा बैल देखील गंभीर जखमी असल्यामुळे आता उरलेली शेतीची कामं कशी करायचा हा शेतकऱ्यासमोर (Farmer) प्रश्न उभा ठाकला आहे.

हे देखील पाहा -

आज बऱ्याच ठिकाणी मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. आर्वी तालुक्यातील बोरखेडी (मदनी) शेतशिवारात शेतकरी अरविंद वामनराव डांगे यांच्या पळसाच्या झाडाखाली बांधून असलेल्या बैलजोडीवर वीज पडल्याने एका बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एका बैलाचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली असून बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान या प्रकरणाची खरांगणा पोलिसांत (Police) नोंद करण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com