वाहन चालकांनो सावधान! राज्यात वाहनांना आग लागण्याच्या घटना वाढल्या

राज्यात आज वाहनांना अचानक आग लागण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. आज राज्यात विरार, पनवेल, डोंबिवली येथे वाहनांना अचानक आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
Vehicle Burning Incidents
Vehicle Burning Incidents saam tv

मुंबई : मुंबईसह (Mumbai) नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यात तुफान पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे रस्त्यात पाणी साचलं आहे. तर दुसरीकडे वाहनांना अचानक आग लागल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. आज राज्यात विरार, पनवेल, डोंबिवली येथे वाहनांना अचानक आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. वाहनांना अचानक आग (Fire) लागण्याच्या घटना वाढल्याने प्रवाशांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे . ( Vehicle Burning Incidents News In Marathi )

Vehicle Burning Incidents
आषाढी वारीसाठी निघालेल्या दिंडीत घुसली जीप; १४ वारकरी जखमी

आज, मंगळवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र, दुसरीकडे आज मुंबई-अहमदाबाद महामार्ग शेजारी असलेल्या के.टी रिसॉर्ट जवळ एका चालत्या सिमेंट मिक्सर अचानकपणे आग लागल्याची घटना घडली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून चालकाने प्रसंगावधान राखत सिमेंट मिक्सर रस्त्याच्या कडेला लावून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

आजची दुसरी घटना ही खोणीं - तळोजा महामार्गावर घडली. आज दुपारी खोणीं - तळोजा महामार्गावरून जात असताना एका मिनी टेम्पोने अचानक पेट घेतला, हे समजताच चालक व क्लिनर तात्काळ बाहेर पडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही वेळातच घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली. त्यानंतर टेम्पोला लागलेली आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या घटनेत टेम्पोचा पुढील भाग संपूर्ण जळून खाक झाला आहे. सदर टेम्पो उल्हासनगरवरून पनवेलच्या दिशेने जात असताना मिनी टेम्पोने पेट घेतला.

Vehicle Burning Incidents
'रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड...'; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

नवीन पनवेल उड्डाणपुलाखाली स्कूल व्हॅनला लागली आग

तर आज तिसरी घटना नवीन पनवेल उड्डाणपुलाखाली घडली. नवीन पनवेल (Panvel) उड्डाण पुलाखाली एका स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतला. शहरातील कांडपिळे सीएनजी पंपामध्ये सीएनजी गॅस भरल्यानंतर ही स्कूल व्हॅन थोडी पुढे गेली असता अचानक व्हॅनने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून आगीमध्ये स्कुल व्हॅनचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने घटनेप्रसंगी व्हॅनमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र,राज्यात वाढत्या वाहनांना अचानक आग लागण्याच्या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com