जादूटोण्याच्या संशयावरून बहीण- भाऊ आणि आईला मारहाण; ५ जणांना अटक

जादूटोण्याच्या संशयावरून बहीण- भाऊ आणि त्यांच्या आईला मारहाण
जादूटोण्याच्या संशयावरून बहीण- भाऊ आणि आईला मारहाण; ५ जणांना अटक
जादूटोण्याच्या संशयावरून बहीण- भाऊआणि आईला मारहाण; ५ जणांना अटकसंजय तुमराम

चंद्रपूर : जादूटोण्याच्या witchcraft संशयावरून बहीण- भाऊ आणि त्यांच्या आईला मारहाण Beating करण्यात आली आहे. नागभीड Nagbhid तालुक्यातील मिंडाळा Mindala गावातील या ठिकाणी धक्कादायक घटना घातली आहे. यामध्ये अशोक कामठे (वय- ४०) आणि यशोदा कामठे (वय- ३८) अशी मारहाण झालेल्या बहीण- भावाची नावे आहेत. या घटनेबाबत फिर्यादी असलेल्या, आईचे इंदिराबाई कामठे (वय- ७०) असे नाव आहे.

हे देखील पहा-

मारहाण झालेले आणि करणारे सर्व आरोपी हे मिंडाळा या गावामधीलच रहिवासी आहेत. अशोक कामठे हा जादूटोणा करतो आणि त्यामुळेच मयुरी सडमाके (वय- २५) हिची तब्येत कायम खराब राहते, असा आरोप करत काल प्रमोद सडमाके (वय- ३५), सीताराम सडमाके (वय- ६६), मयुरी सडमाके (वय- २५), पिल्ला आत्राम (वय- २०) आणि चंद्रकला आत्राम (वय- ५५) यांनी यशोदा आणि इंदिराबाई यांना लाथा- बुक्क्यांनी तर अशोक याना बांबू आणि बॅटने मारहाण करण्यात आली आहे.

जादूटोण्याच्या संशयावरून बहीण- भाऊआणि आईला मारहाण; ५ जणांना अटक
BREAKING | जादूटोणा केल्याच्या संशयावरून वृद्धांसह कुटुंबाला मारहाण, 7 जण जखमी

याप्रकणी नागभीड पोलिसांनी एकाच कुटूंबातील ५ जणांना अटक केली आहे. या प्रकरणी नागभीड पोलिसांनी Police सर्व आरोपींना अटक Arrested करून, जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे. जिवती Jivanti तालुक्यातील वणी- खुर्द Wani- Khurd या ठिकाणी जादूटोण्याच्या संशयावरून ७ लोकांना मारहाणीची घटना ताजी असतांनाच परत एकदा चंद्रपूर Chandrapur जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण झाल्याची खळबळ उडाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com