बुलढाणा अर्बन बॅंकेवर आयकरचे पुन्हा छापे

धर्माबाद शाखेची पथकाकडून चौकशी सुरू
बुलढाणा अर्बन बॅंकेवर आयकरचे पुन्हा छापे
बुलढाणा अर्बन बॅंकेवर आयकरचे पुन्हा छापेसंतोष जोशी

नांदेड - जिल्ह्यातील धर्माबाद येथील बुलढाणा अर्बन सोने तारणं बॅंकेवर आज पुन्हा आयकर विभागाच्या पथकाने छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे. मागील 15 दिवसांपूर्वी ही बुलढाणा अर्बंन बॅंकेच्या धर्माबाद शाखेवर आणि बँकेच्या संचालकांच्या प्रतिष्ठाणांवर आयकर ने छापे टाकून दोन दिवस तपासणी केली होती. आता आज पुन्हा आयकर विभागाच्या पथकाने धर्माबादच्या बुलढाणा अर्बंन सोने तारण बॅंकेत तपासणी सुरू केली आहे.

हे देखील पहा -

बुलढाणा बॅंकेतील अनियमितता पुन्हा एकदा समोर आली आहे. बुलढाणा अर्बन बॅंकेने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी संबंधीत चार साखर कारखान्यांना नियमांचे उल्लंघन करुन मोठे कर्ज दिल्याची बाब समोर आली होती.

बुलढाणा अर्बन बॅंकेवर आयकरचे पुन्हा छापे
औरंगाबादमध्ये आठवडाभरात चार पटीने लसीकरणात वाढ

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुलढाणा अर्बन बॅंकेने कर्ज वाटपात मोठी अनियमितता आहे. त्यामुळे आपण बुलढाणा बॅंकेच्या मुख्य शाखेला आणि नांदेड येथे भेट देणार असल्याच जाहीर केलं होतं. दरम्यान, सोमय्या नांदेडला येण्यापुर्वीच आज पुन्हा छापेमारी सुरू झाल्याने सोमय्या यांच्या आरोपाला पुष्टी मिळाल्याचे दिसत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com