Income Tax Raid: जालन्यात इन्कम टॅक्स विभागाने गुप्तता पाळण्यासाठी लढवली अनोखी शक्कल

इन्कम टॅक्सच्या टीमने जालन्यातील कारखानदारांच्या घरी, स्टील कार्यालयांवर छापे टाकत तब्बल ३९० कोटींचे घबाड समोर आले.
Income Tax
Income TaxSaam Tv

औरंगाबाद - फिल्मी स्टाईल जालन्यात एन्ट्री मारून कोट्यवधींच्या बेहिशेबी मालमत्तेवर कारवाई करताना इन्कम टॅक्स विभागाने गुप्तता पाळण्यासाठी आणखी एक शक्कल लढवली. अंजली वेड्स राहुल लग्नाचे स्टिकर लावून जालन्यात पोहचण्यासाठी आणि परतण्यासाठी चक्क वाहतुकीसाठी सुरू नसलेल्या समृद्धी महामार्गाचा वापर केला. नाशिक (Nashik) आणि औरंगाबाद (Aurangabad)येथील इन्कम टॅक्सच्या टीमने जालन्यातील कारखानदारांच्या घरी, स्टील कार्यालयांवर छापे टाकत तब्बल ३९० कोटींचे घबाड समोर आले.

हे देखील पाहा -

या छाप्याचे अतिशय सूक्ष्म नियोजन करत पथक कोणत्या दिशेने निघाले आहे, याची कुणकुण टोल नाक्यावरूनही कुणाला लागू नये, यासाठी शिर्डीहून थेट समृद्धी महामार्गाचा वापर करण्यात आला होता. पुणे, नाशिक, ठाणे, औरंगाबादच्या अधिकान्यांना शिर्डी या मध्यवर्ती ठिकाणी बोलावून संपूर्ण छाप्याबाबतच्या माहितीची देवाणघेवाण केल्यानंतरच पथके रवाना झाली होती.

जालना औद्योगिक वसाहतीतील स्टील कंपनीच्या व्यापान्यांकडे कोट्यवधींची रोकड असून त्यांनी जीएसटी व आयकर चुकवला आहे, अशी गोपनीय माहिती प्राप्तिकर विभाग तसेच गुन्हे व अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी औरंगाबादचे पथक सोबत घेऊन २ ऑगस्टलाच जालना गाठले होते.

Income Tax
Pimpari-Chinchwad: दहीहंडीच्या वर्गणीसाठी दादागिरी; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

वेगवेगळ्या दिशेने व मार्गाने जात या पथकांनी व्यावसायिकांची घरे कारखाने तसेच कार्यालयांवर छापे टाकले. तेथे सोन्याचे दागिने, जडजवाहीर, रोकड असा ९० कोटींचा ऐवज आणि ३०० कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तांची कागदपत्रे असे तब्बल ३९० कोटींचे पवाड हाती लागले. ही सर्व रक्कम व दागिने, कागदपत्रे नाशिक कार्यालयात एकत्रित करून मुंबईत पाठविण्यात आल्याचे समजते. या छाप्यांचा पुढील तपास औरंगाबाद कार्यालयाकडून केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com