कोरोनाने कर्जतकरांचे वाढवले टेन्शन!

कोरोनाने कर्जतकरांचे वाढवले टेन्शन!
corona

अहमदनगर : जिल्ह्यातील बहुतांशी भागात कोरोनाचे थैमान अद्यापि सुरूच आहे. पुणे किंवा मोठ्या शहराजवळील तालुक्यातील रूग्ण संख्या कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आतापर्यंत आलेल्या दोन लाटेमध्ये संगमनेर, राहाता आणि पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळले.

कर्जत तालुक्याला पुणे आणि सोलापूर जिल्ह्याची हद्द लागते. परिसरातील लोकांची शेजारीला तालुके किंवा जिल्ह्यात आवक-जावक असते. त्यामुळे साथ वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यातच काही बेफिकीर लोकही याला जबाबदार आहेत.Increase in the number of corona patients in Rashin area of Karjat taluka

राशीनसह परिसरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. वीस ते पन्नास वयोगटातील रुग्णांची संख्या अधिक आहे. स्थानिक प्रशासनाकडून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना न राबविल्यास कोरोनाचा कहर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

परिसरातील गावात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. तपासणी आणि उपचारासाठी सरकारी रुग्णालयामध्ये जाणाऱ्या रुग्णांपेक्षा खासगी रुग्णालयामध्ये जाण्याचा लोकांचा मोठा ओढा असल्याने बाधित रुग्णांच्या शासकीय आकडेवारीच्या तिप्पट रुग्ण खासगीत उपचार घेत आहेत. त्यामुळे शासन स्तरावर जरी बाधितांची आकडेवारी कमी दिसत असली तरी प्रत्यक्ष रुग्णसंख्या जास्त आहे. शासन पातळीवर दाबली जाणारी कोरोना बाधितांची आकडेवारी लोकांच्या जीवाशी खेळला जाणारा धोकादायक खेळ ठरण्याची दाट शक्यता आहे.

राशीनसह परिसरातील गावात बुधवारी (ता.1) सक्रीय असणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे (सरकारी रूग्णालयानुसार) : राशीन-13, चिलवडी-14, पिंपळवाडी-14, बारडगाव सुद्रिक - 14, खेड -17, गणेशवाडी -7, परीटवाडी -8,आखोणी- 6, दुधोडी-12, ताजू- 11, भांबोरे -3, शिंपोरे-3, अळसुंदे-7, देशमुखवाडी-2, बेनवडी-, कोळवडी-1, मानेवाडी-1, बारडगाव दगडी-1, मात्र यापेक्षा अधिक रुग्ण या गावांमध्ये आहेत.

कोरोनाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी खासगी दवाखाने भरले आहेत. कर्जत तालुक्यात सध्या दररोज 30 ते 50 च्या दरम्यान रुग्ण बाधित निघत आहेत. लोकांनी काळजी न घेतल्यास ही रुग्णसंख्या येत्या पंधरा दिवसात दुप्पट होण्याची शक्यता राशीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलीप व्हरकटे यांनी व्यक्त केली आहे. Increase in the number of corona patients in Rashin area of Karjat taluka

राशीन जिल्हा परिषद गटात साडे अकरा हजार लोकांचे लसीकरण झाले आहे. सुमारे 28 हजार लोकांचे लसीकरण बाकी आहे. सध्या दिवसाला आठशे लसी उपलब्ध होत असल्याने लवकरच राहिलेल्या लोकांचे लसीकरण पूर्ण होईल असेही डॉ.व्हरकटे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com