तापमानात वाढ; परभणीकरांची जीवाची काहिली...

गेल्या तीन दिवसांपासून परभणीत उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. काल परभणीचे तापमान 42.2अंश डिग्री सेल्सिअसवर जाऊन पोहोचले होते.
तापमानात वाढ; परभणीकरांची जीवाची काहिली...
Heat WaveSaam Tv

राजेश काटकर

परभणी: गेल्या तीन दिवसांपासून परभणीत उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. काल परभणीचे तापमान 42.2अंश डिग्री सेल्सिअसवर जाऊन पोहोचले होते. सततच्या तापमानामुळे जमीन, इमारती तापल्या असून ज्यामुळे नागरिकांना जास्त उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे परभणीकरांच्या (Parbhani) जीवाची काहिली होत आहे. उष्णतेची लाट (Heat Wave) पुढील दोन दिवसांत तापमानाचा पारा 45ते 46 डिग्री सेल्सिअस पर्यत जाईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Heat Wave
Raj Thackeray Latest Update: राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल

कोरोनाच्या (Corona) दोन वर्षाच्या काळात उद्योग धंदे बंद होते नागरिकानी गेली दोन उन्हाळे घरी बसून काढले. आता उद्योगधंदे पूर्वपदावर येत आहेत पण प्रचंड तापमानामुळे नागरिक सकाळी अकरा वाजल्यानंतर घराबाहेर पडताना दिसत नाहीत. तर दिवसभराच्या उष्णतेमुळे संध्याकाळनंतर बाजारात खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे.

हे देखील पहा-

शहरात बाजारहटासाठी येणारी ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात रोडावली आहे. दुसरीकडे प्रचंड तापमानामुळे ताप, खोकल्यासारखे साथीचे आजार बळावले आहेत. बाजारात थंड पेयाचि मागणी वाढली आहे तर घरात राहावे तर भारनियमन व सतत जाणाऱ्या विजेमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.