औरंगाबाद पॅटर्न: 'यामुळे' वाढलं लसीकरण...

गेल्या काही दिवसांपासून ओस पडलेल्या लसीकरण केंद्रांमध्ये आता नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे लसीकरणाचा 'औरंगाबाद पॅटर्न' नव्यानं समोर आला आहे.
औरंगाबाद पॅटर्न: 'यामुळे' वाढलं लसीकरण...
औरंगाबाद पॅटर्न: 'यामुळे' वाढलं लसीकरण...Saam Tv

औरंगाबाद: औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात 'लस नाही तर प्रवेश नाही' (No Vaccine; No Entry) हा नियम लागू करण्यात आला आह, त्यामुळे औरंगाबाद शहरात लसीकरणाच्या टक्क्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ओस पडलेल्या लसीकरण केंद्रांमध्ये आता नागरिकांची गर्दी होत आहे. त्यासाठी औरंगाबाद शहरात महानगरपालिकेच्या वतीने ७० ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. (Increased corona vaccination due to Aurangabad pattern)

हे देखील पहा -

औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील कोणत्याही दुकानात खरेदीसाठी गेल्यास लस घेतली नसेल तर दुकानात प्रवेश दिला जाणार नाही. पेट्रोल पंप, गॅस, रेशन, शॉपिंग मॉल, मोठी किराणा मालाचे दुकाने, बहुमजली दुकाने, कापड दुकानांचे मॉल, बहु-उत्पादन विक्री दुकानामध्ये कोरोना लसीकरण प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक केले आहे. मात्र तिथे फारशी तपासणी होत नसली तरी नागरिकांना मतं लसीकरणाचे महत्त्व अधिक हळू-हळू कळू लागले आहे. त्यामुळे लसीकरणाचा 'औरंगाबाद पॅटर्न' नव्यानं समोर आला आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com