अकोल्यात रात्रीची संचारबंदी वाढवली; आता 23 नोव्हेंबर पर्यंत संचारबंदी

अकोला शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण अकोला शहरात कलम 144 जारी करण्यात आले असून 23 नोव्हेंबर रात्रीची संचारबंदी वाढवण्यात आली आहे.
अकोल्यात रात्रीची संचारबंदी वाढवली; आता 23 नोव्हेंबर पर्यंत संचारबंदी
अकोल्यात रात्रीची संचारबंदी वाढवली; आता 23 नोव्हेंबर पर्यंत संचारबंदीजयेश गावंडे

अकोला : अकोला शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण अकोला शहरात कलम 144 जारी करण्यात आले असून 23 नोव्हेंबर रात्रीची संचारबंदी वाढवण्यात आली आहे. ही संचारबंदी रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे. असे आदेश उपविभागीय दंडाधिकारी डॉ. निलेश अपार यांनी आज निर्गमित केले.

हे देखील पहा :

आदेशात दि.२३ रोजी पर्यंत संचारबंदीत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार दि. २३ रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याकालावधीत आरोग्य सेवा, कोविड लसीकरण सत्र सुरु राहतील. तसेच या कालावधीत धार्मिक तेढ वाढविणारे, भावना भडकविणारे असे कृत्य, वक्तव्य, अफवा पसरविण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

अकोल्यात रात्रीची संचारबंदी वाढवली; आता 23 नोव्हेंबर पर्यंत संचारबंदी
Sahitya Sammelan : साहित्य संमेलनाचा भूमिपूजन सोहळा दिमाखात पार!

समाज माध्यमांद्वारे असे संदेश प्रसारित करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारे रॅली, धरणे, मोर्चे व अन्य कार्यक्रमांचे आयोजन होणार नाही. निवडणूक प्रचार संबंधित कार्यक्रम असल्यास त्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. या आदेशाचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com