Maharashtra Politics : शिंदे साहेब आम्हाला मंत्रिपद देणारच; बच्चू कडूंनी व्यक्त केला विश्वास

'आमच्यासाठी मंत्री पद हा फार मोठा विषय नाही, आमच्या कामात मंत्रिपदाची ताकद आहे.'
Bacchu Kadu Latest News
Bacchu Kadu Latest NewsSaam TV

Bacchu Kadu Latest News : दोन महिन्यांपूर्वी राज्यातील शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा पार पडला. या टप्प्यात शिंदे गटातील ८ आणि भाजपच्या ८ मंत्र्यांनी शपथ घेतली. पहिल्या टप्प्यात एकाही अपक्ष आमदाराचा समावेश नव्हता. त्यामुळे मंत्रिपदावर वर्णी न लागल्याने अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) नाराज असल्याची चर्चा रंगली. दरम्यान, या चर्चेवर बच्चू कडू यांनी आज महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. (Bacchu Kadu News Today)

Bacchu Kadu Latest News
Bacchu Kadu : ...तर मुख्यमंत्री प्रहारचाच असता; बच्चू कडू काय म्हणाले? वाचा...

काय म्हणाले बच्चू कडू?

'आमच्यासाठी मंत्री पद हा फार मोठा विषय नाही, आमच्या कामात मंत्रिपदाची ताकद आहे. तरीसुद्धा आम्ही मंत्री बनल्याशिवाय राहणार नाही, तो आमचा अधिकार आहे. शिंदे साहेब आम्हाला मंत्री करतील. त्यामुळे त्याची चिंता करायची आवश्यकता नाही, असा विश्वास अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत (Amravati) माध्यमांसोबत संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

'मंत्रिपद केव्हा मिळणार हे सांगू शकत नाही'

यावेळी पत्रकारांनी बच्चू कडू यांना मंत्रिपदावरून प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना बच्चू कडू म्हणाले की मंत्रिपद केव्हा मिळणार हे सांगू शकत नाही, तो माझ्या आटोक्या बाहेरचा विषय आहे. आमच्यासाठी मंत्रिपद हा फार मोठा विषय नाही. आमच्या कामात मंत्रिपदाची ताकद आहे. तरीसुद्धा आम्ही मंत्री बनल्याशिवाय राहणार नाही, तो आमचा अधिकार आहे. शिंदे साहेब आम्हाला मंत्री करतील, असा विश्वास बच्चू कडूंनी व्यक्त केला. (Bacchu Kadu Marathi News)

Bacchu Kadu Latest News
Uday Samant : वेदांतासारखाच नाणार पण जाणार? उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काय सांगितलं? वाचा...

'मुख्यमंत्री प्रहारचाच राहिला असता'

अमरावतीत आज शेकडो कार्यकर्त्यांनी प्रहारमध्ये प्रवेश केला. या मेळाव्याला संबोधित करताना आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं. 'राजकारणात काहीही होऊ शकतं आज काय आणि उद्या काय कुणीच सांगू शकत नाही. मी तुम्हांला सांगू इच्छितो प्रहारजवळ जर १० आमदार असते, वेळ जर थोडी अधिक बदलली असती, तर येणारा मुख्यमंत्री सुद्धा प्रहारचाच राहिला असता', असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com