
महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहत आहेत. भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि ठाण्याला कोणत्याही प्रकारचा अलर्ट जारी नाही, परंतु रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी 'यलो' अलर्ट जारी केला आहे. (Latest Marathi News)
राज्यात पुढील २ ते ३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार होत असून गुरूवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहेत. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात ५ ते ७ दिवस पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहत आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांची पिके करपू लागली आहे. याचदरम्यान, हवामान खात्याने मराठवाड्यात ३ दिवसांचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मराठवाड्यात ६ ते ९ सप्टेंबर रोजी बहुतांश जिल्ह्यात हलका, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात ८ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर दरम्यान सरासरी पावसाची शक्यता आहे.
आज वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस लांबल्याने खरीपाची पिके संकटात सापडली होती. आता पाऊस बरसल्याने पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे. तसेच पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात महिनाभरानंतर पावसाची एन्ट्री झाली आहे. जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यानंतर शेतकऱ्यांकडून पाण्यासाठी देवाकडे साकडं घालण्यात आलं होतं. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे एका शेतकरी कुटुंब आनंद साजरा केला आहे. चक्क ढोल ताशांचा गजरात आपला आनंद व्यक्त केला आहे. या आनंद साजरा करण्याऱ्याचा व्हिडिओ जिल्हाभरात चांगलाच व्हायरल होत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.